चंद्रपूर : राज्यातील कॉग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी भद्रावती-वरोरा विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्लीत अखिल भारतीय कॉग्रेसच्या माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व माजी खासदार राहुल गांधी यांची सहकुटूंब भेट घेतली. यावेळी श्रीमती सोनिया गांधी यांनी आमदार धानोरकर यांना, मी देखील अशा कठीण प्रसंगातून गेले आहे, धीर सोडू नका, नव्या दमाने उभ्या व्हा असा, गांधी कुटूंंबिय तुमच्या पाठीशी आहे असा धीर देत सांत्वन केले.

खासदार बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजी दिल्लीत एका खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यावेळी श्रीमती सोनिया गांधी व माजी खासदार राहुल गांधी यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे फोनवरून सांत्वन केले होते. दु:खातून सावरल्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आता घराबाहेर पडून कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे. ४ जुलै रोजी खासदार बाळू धानोरकर यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा >>> “त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करा अथवा…”; आमदार शिंगणेंच्या ‘यू-टर्न’बाबत शरद पवारांचं विधान, म्हणाले…

तिथे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदार धानोरकर यांचे सांत्वन केले. त्यानंतर आज आमदार धानोरकर यांनी दिल्लीत कॉग्रेसच्या माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व माजी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत मुलगा मानस व पार्थ, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी खासदार धानोरकर यांच्या निधनानंतरची जिल्ह्यातील परिस्थिती कथन केली. यावेळी श्रीमती सोनिया गांधी यांनी, घाबरू नका, गांधी कुटूंबिय तुमच्या पाठीशी आहे या शब्दात धीर दिला. यावेळी श्रीमती गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दु:खद निधनानंतर  त्यांच्यावरही असा प्रसंगी ओढवल्याची आठवण सांगितली. तेव्हा तुमच्या मुलांपेक्षाही तेव्हा राहूल लहान होते. मलाही तेव्हा खुप त्रास झाला, याची आठवण करुन दिली.

हेही वाचा >>> चार आत्महत्यांनी यवतमाळ हादरले

श्रीमती गांधी यांनी आमदार धानोरकर आणि दोन्ही मुलांना मायेने जवळ घेतले. गांधी कुटुंबीय तुमच्या नेहमी पाठीशी राहीली. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा, असे सांगितले. राहूल गांधींनी स्वीय सहाय्यकाचा आणि स्वतःचा भ्रमणध्वनी आमदार धानोरकरांना दिला. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले. मुल लहान आहे. राजकारण होतच राहील. त्यांची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला. आमदार धानोरकरांना सोनिया गांधींना मायेने जवळ घेतले. तेव्हा त्यांचा बांध फुटला. गांधींचेही डोळे पाणावले. राज्यातील एकमेव खासदार असल्यामुळे धानोकरांचा सोनिया गांधीशी थेट संपर्क होता. त्या त्यांना नावानिशी ओळखत होत्या. आठ महिन्यांपूर्वीच धानोरकर दांम्पत्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती.

Story img Loader