लोकसत्ता टीम

चंद्रपूर: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात एकीकडे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात जंगी स्वागत व आशीर्वाद सभेने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेस पक्षात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारी वरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेस पक्ष श्रेष्ठी कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष असताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाज माध्यमावर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये “उमेदवारी आपलीच आहे, विजय आपलाच आहे”. थोड धीरान वागा….

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये आमदार धानोरकर म्हणतात, ‘आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे.’ असं त्यांनी लिहिलं आहे.

आणखी वाचा- “विदर्भात एकच जागा वाट्याला आल्याने आमच्यातर्फे लढा,” शरद पवारांची ऑफर; अमर काळे म्हणतात, “वेळ तर द्या…”

महाराष्ट्र काँग्रेस मुक्त होण्यापासून खासदार बाळू धानोरकर यांनी वाचवले. भाजपचे हंसराज अहिर यांचा ४४ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव करीत राज्यातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार धानोरकर ठरलेत. मात्र त्यांचा अकाली निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला. धानोरकर यांच्यानंतर चंद्रपूर लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चर्चा रंगली होती. बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या बाबत मतदार संघात सहानुभूतीची लाट आहे. त्यांना भावी खासदार म्हणून कार्यकर्ते बघत होते. मात्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. पाठोपाठ आमदार सुभाष धोटे यांनी ही स्पर्धेत असल्याचे वक्तव्य केले.

उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षात मोठी चढाओढ सुरू आहे. अश्यातच आमदार धानोरकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या,बाळूभाऊंच्या पश्चात आपण सर्वांनी अतिशय धीराने आणि धैर्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या विचारांची आणि विधायक कार्याची पताका धरून ठेवली आहे.आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्याच धीराने आणि धैर्याने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.आज काळ आणि वेळ बदलली असली तरीही परिस्थिती बदलली नाहीये. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त ही आपल्या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपणा सर्वांना थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर धैर्याने मैदान गाजवायचं आहे, असे भावनिक आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.