बुलढाणा : सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी सत्ता संघर्ष व अपात्रतेसंदर्भात दिलेला निर्णय स्वागतार्ह अन दिशादर्शक असल्याची प्रतिक्रिया मेहकरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी दिली आहे.
आज दुपारी पाच सदस्यीय खंडपीठाने बहू प्रतिक्षित निकाल दिला. हा निकाल राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार, उभय पक्षांचे नेते, समर्थक अपक्ष आमदारांसह आमदार संजय रायमूलकर यांनाही मोठ्ठा दिलासा देणारा ठरला. आज दिवसभर मेहकर मतदारसंघात असलेले आमदार रायमूलकर यांनी निकालानंतर ‘लोकसत्ता’सोबत संवाद साधताना ही मार्मिक व संयमी प्रतिक्रिया दिली. आजच्या निकालाचे थोडे फार दडपण होते, अशी विनम्र कबुली देतानाच त्यांनी सांगितले की, न्यायदेवतेवर विश्वासही होता. निकाल दिलासा देणारा तर आहेच, पण तो दिशादर्शकसुद्धा आहे. या निकालाने विधानसभा सभापती या पदाचे संवैधानिक महत्व अधोरेखित झाले आहे. न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी परत सभापतीकडे पाठविले आहे.
या निकालामुळे सरकारवरील संकटाचे सावट दूर झाले असून आमचे नेते एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील हे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतदेखील ते भाजपा सेना युतीचे नेतृत्व करतील. आजच्या निकालाचे दडपण असले तरी आज दिवसभर मी कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघातच होतो. मुळात माझी ताकद, श्रीमंती कार्यकर्तेच आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आहे, असे ते म्हणाले.