बुलढाणा : महायुतीसाठी लोकसभा निवडणुकीत संभाव्य प्रचाराचा मुद्धा असलेला प्रस्तावित ‘भक्ती मार्ग’ रद्द करण्याची मागणी करून आमदार राजेंद्र शिंगणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा मार्ग नकोच अशी ठाम भूमिका घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भावना गवळी कामाला लागल्या, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परतताच….

जिजाऊंचे माहेर घर सिंदखेडराजा ते विदर्भ पंढरी शेगाव असा हा प्रस्तावित ‘भक्ती मार्ग’ आहे. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातील तब्बल ४३ गावांतील सुपीक शेत जमीन यासाठी संपादित करण्यात येणार आहे. यामुळे हजारो शेतकरी  भूमिहीन होणार आहे. यामुळे या मार्गाला मंजुरी मिळाल्याबरोबर विरोध होऊ लागला आहे. ४३ गावांतील अनेक ग्रामपंचायतींनी या विरोधात ठराव घेतले आहे. यापाठोपाठ आता शिंगणेंनी  उडी घेतली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंगणे यांना लेखी पत्र पाठविले आहे. यात त्यांनी वरील मुद्दे मांडून सुरू असलेले  भूसंपादन तातडीने थांबवावे आणि मार्गच रद्द करावा अशी आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, हा मार्ग महायुतीच्या प्रचाराचा संभाव्य मुद्दा असणार हे जवळपास  निश्चित आहे. यामुळे अजितदादा गटाने विरोध केल्याने युतीची अडचण होणार असल्याचे मानले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla rajendra shingne demand to cancel proposed bhakti marg scm 61 zws