भंडारा : जिल्ह्यातील तुमसर विधान सभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हे अनेकदा त्यांच्या असभ्य बोलण्यामुळे चर्चेत राहतात. सन २०२२ मध्ये पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे, महिला कॉन्स्टेबलसह कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करणे आणि धमकावणे या आरोपाखाली त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दोनच महिन्यांत आमदार कारेमोरे यांच्याकडून शासकीय कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानंतर काल पुन्हा आमदार राजू कारेमोरे यांची जीभ घसरली. तुमसर नगर परिषदच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना कॉल करून आमदार राजू कारेमोरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडियो क्लिप सध्या समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारित झाली होत असून यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्याना शिवीगाळ करणे आणि धमकावणे यामुळे तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हे अनेकदा अडचणीत आलेले आहे. असे असताना आमदार कारेमोरे यांच्यावर पुन्हा एकदा महिला अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलण्यावरून लोकांच्या टीकेची झोड उठली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तुमसर येथे आलेले असताना नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याऐवजी कार्यक्रम असफल करण्यात आल्याचा आरोप करीत आमदार कारेमोरे यांनी चक्क नगर परिषद मुख्याधिकारी वैद्य यांच्यावर आगपाखड केली. याबाबत विचारणा करण्यासाठी मुख्याधिकारी वैद्य यांना संपर्क केला असता त्यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.

Amol Khatal Sangamner, Amol Khatal of Shivsena,
अहमदनगर : संगमनेरमधून माजी मंत्री आमदार थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचे अमोल खताळ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Anees Ahmed Congress, Anees Ahmed, Congress,
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा बंडाचा झेंडा? पक्षाच्या जातीय गणितावर थेट टीका, म्हणाले…
Hadapsar assembly constituency
आघाडीत बिघाडी, त्यावर ‘आघाडी’चीच कुरघोडी! हडपसरमध्ये ‘मविआ’च्या उमेदवाराला ‘मविआ’मधूनच विरोध, खासदारांकडे गाऱ्हाणे
Former deputy mayor Kulbhushan Patil filed an independent nomination against Jayshree Mahajan print politics news
जळगावमध्ये माजी महापौरांविरोधात माजी उपमहापौरांचे बंड
Complaint application against Priya Phuke in Ambazari police station
प्रिया फुकेंविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज
Arvind Kejriwal
Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, आपचा भाजपावर गंभीर आरोप
H( प्रातिनिधिक छायाचित्र )uman bomb threat on plane Threat in the name of a woman in Andheri Mumbai news
विमानात मानवी बॉम्बची धमकी; अंधेरीतील महिलेच्या नावाने धमकी

हे ही वाचा…राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण! येत्या २४ तासात…

आणि आमदार साहेबांची ‘सटकली ‘…

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या (अजित पवार गट) जन सन्मान यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमसर येथे येणार होते. या कार्यक्रमासाठी आमदार कारेमोरे यांनी मोठा तामझाम केला होता. मात्र एवढे करून त्यांच्या कार्यक्रमात मिठाचा खडा पडला. तुमसर शहरातील आणि सभामंडपापुढे खड्डे तसेच चिखल यामुळे आमदार साहेबांच्या केलेल्या कामावर पाणी फिरले गेले आणि अजित दादांसमोर तुमसर विधान सभा क्षेत्राचा खरा चेहरा आला. त्यामुळे आमदार कारेमोरे यांची चांगलीच ‘सटकली’ आणि त्यांनी थेट तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना कॉल करून अश्लील भाषेत बोलायला सुरुवात केली.

हे ही वाचा…वाहनकोंडीमुळे ‘ संजुबा’च्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका

काय बोलले आमदार कारेमोरे..

“वैद्य मॅडम तुम्ही माझ्यासोबत बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या. आमच्या कार्यक्रमाचा पूर्ण सत्यानाश केला तुम्ही. तुमच्या एका तरी कर्मचाऱ्याने सहकार्य केले का? हे सगळं तुम्हाला महागात पडणार आहे सांगून ठेवतो. अरे आमचा कार्यक्रम फेल करण्यासाठी तुम्ही चिखल केला, आम्हाला परेशान केले मुद्दाम, नाही जमत होत तर नाही म्हणून सांगायचे होते आमच्यात ताकद आहे कार्यक्रम करायची. मॅडम, तुम्ही विकारग्रस्त आहात. विकाराने भरलेले आहात. जास्त बकबक करू नका. निपटविण मी तुम्हाला, मी तुम्हाला निपटवून दाखवतो.” अशाप्रकारे आमदार कारेमोरे यांनी न. प. मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना कॉल वरून बोलले. हे बोलत असताना त्यांनी अनेकदा शिवीगाळ केली.

हे ही वाचा…गडकरींची कबुली, विदर्भात पाचशे-हजार कोटी गुंतवणूक करणारे सापडत नाही …

कारेमोरे यांच्यावर टीका

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान तुमसर येथे ‘लाडक्या बहिणीं’वर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्यांशी असे असभ्य वर्तन करणे कुणालाही रचलेले नाही. त्यामुळे महिला आणि अधिकाऱ्यांशी कायम अशा प्रकारे असभ्य भाषेत बोलल्यामुळे आमदार कारेमोरे यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.

हे ही वाचा…रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..

अजित पवारांनी दिली होती संधी मात्र…

सध्या कुठल्याही विधान सभा क्षेत्राच्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही असे असताना तुमसर येथे आलेले असताना उपमुख्यमंत्री यांनी ‘तुम्ही राजू कारेमोरे यांना पुन्हा निवडून द्या ” असे बोलून कारेमोरे यांना पुन्हा संधी दिली हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. आमदार कारेमोरे हे या संधीचे सोने करतील यावर मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पक्षाने उमेदवाराच्या बाबतीत पूनर्विचार करावा अशी चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.