लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोला : अकोला पूर्वचे भाजप आमदार तथा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांची मंत्रिपदाची संधी हुकली. मात्र, पक्षाने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधिमंडळातील भाजपच्या मुख्य प्रतोदपदी आमदार रणधीर सावरकर यांची वर्णी लागली. यामुळे आमदार रणधीर सावरकरांना महत्त्वाच्या अधिकारांसह विशेष दर्जा प्राप्त होणार आहे.

अकोला जिल्ह्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. नव्या फडणवीस सरकारमध्ये देखील जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा फोल ठरली.

आणखी वाचा-आदित्य ठाकरेंनी कोणत्या काँग्रेस आमदाराच्या बरखास्तीची मागणी केली?

जिल्ह्यातून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचे नाव मंत्रिपदासाठी चांगलेच चर्चेत होते. अकोला पूर्वतील मतदारांनी प्रथमच एकाच आमदाराला तिसऱ्यांदा संधी दिली. आमदार सावरकरांनी हॅट्ट्रिकचा इतिहास करण्यासोबतच ५० हजार ६१३ मताधिक्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचितचा चितपट केले. लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाचा बालेकिल्ला कायम राखण्यात सुद्धा आ. सावरकरांचा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभेत अकोट व मूर्तिजापूरची जागा निवडून आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अभ्यासू आमदार म्हणून रणधीर सावरकर यांची ओळख असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत. गटनेता निवडीच्या बैठकीत सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदावर त्यांना संधी मिळू शकली नाही. त्यावर कुठलीही नाराजी न व्यक्त करता आमदार रणधीर सावरकर यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.

आणखी वाचा-अमित शहांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अकोल्यात वंचित आक्रमक; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

आता पक्षाच्या नेतृत्वाने आमदार रणधीर सावरकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी रणधीर सावरकर यांची निवड करण्यात आली. या निवडीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिल्याचे पत्र महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सहसचिवांनी निर्गमित केले. भाजप गटनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांच्यानंतर मुख्य प्रतोद म्हणून रणधीर सावरकर यांना पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अगोदर भाजपचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी होती. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता मुख्य प्रतोद म्हणून आमदार रणधीर सावरकर कामकाज सांभाळतील. या पदामुळे आमदार सावरकर यांना विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. या निवडीबद्दल अकोल्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून जल्लोष केला.

पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने विश्वास दाखवून मोठ्या पदाची जबाबदारी दिली. त्याला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न राहील. हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान आहे. -आमदार रणधीर सावरकर, मुख्य प्रतोद, भाजप.