महेश बोकडे

महाविकास आघाडी चे सरकार असतांना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाकडून सतत आवाज उचलले जात होते. परंतु आता एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांसह जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी करतसत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

लोकसत्ताशी भ्रमनध्वनीवर शुक्रवारी बोलतांना भाजपचे नेते माजी मंत्री व सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्यचे मुख्य कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनी न्याय मागण्यांसाठी पाच महिने संप केला. त्यावर शासनाने बऱ्याच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही मागण्या मान्य होत नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतांना विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्मचाऱ्यांचा प्रश्न लावून आंदोलन केले. कालांतराने आमचे म्हणजे एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे तातडीने प्रश्न सुटने अपेक्षीत होते. परंतु उलट होतांना दिसत आहे. संघटनेचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि मी दोन- तीन वेळा एसटी कर्मचाऱ्यांच्या १६ मागण्यांसाठी परीवहन खाते असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना विनंती केल्यावरही त्यांनी एकदाही एसटीच्या प्रश्नावर चर्चेसाठी बोलावले नाही. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्यांना सत्तेवर आल्यावर काय होते? हे कळायला मार्ग नाही. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी न्याय असून २८ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आत्मक्लेश आंदोलन केले जाणार असल्याचेही खोत यांनी सांगितले.

Story img Loader