वर्धा : महाराष्ट्र विधिमंडळाचे सलग सहा वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दोन्ही सभागृहांतील उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. हिंगणघाट येथील भाजप आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला असून या श्रेणीतील ते विदर्भातील एकमेव आमदार ठरले आहेत.
ते म्हणतात की विविध निकषावर ही निवड केल्या जाते. विधिमंडळाची उन्हाळी, पावसाळी व हिवाळी तसेच एखादे विशेष असे चार अधिवेशने होतात. आमदार झाल्यानंतर मी या सर्व अधिवेशनात हजर राहिलो असून माझ्या उपस्थितीचे प्रमाण ९९ टक्के आहे. अधिवेशनादरम्यान वडिलांचे निधन झाले होते. म्हणून गैरहजर राहिलो. तसेच सलग तीन अधिवेशनात मला तालिका अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. ती उत्कृष्टपणे सांभाळल्याची पावती मिळाली होती. त्यात सर्वाधिक गुण मिळाले. सर्वाधिक कामकाज या काळात झाले. तालिका अध्यक्ष असताना सर्वाधिक लक्षवेधी प्रश्न लागले. अन्यथा तीन किंवा चार प्रश्न साधारणपणे लागत असल्याची आकडेवारी आहे. त्यात आपण सरस ठरलो, याचा आनंद वाटतो. सर्वात अधिक तारांकित प्रश्न विचारले. सभागृहात किती वेळ बसता याची पण नोंद होते. हा बहुमान हिंगणघाटकरांनी दिलेल्या प्रेमाची मी पावती समजतो. विदर्भाचा हा बहुमान म्हणता येईल. अन्य उत्कृष्ट भाषण म्हणून पुरस्कृत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – महाविकास आघाडी महाराष्ट्राला कलंकित करीत आहे, बावनकुळेंची टीका
२०१८ ते २०२४ या सहा वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करीत प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र पुरस्कार देण्यात आले. विधिमंडळ कार्यालयातून पुरस्कृत आमदारांना फोनद्वारे ही माहिती देण्यात आली. अधिकृत पत्र पण पाठविण्यात आल्याची माहिती आहे. हे पुरस्कार लवकरच आयोजित होणाऱ्या एका समारंभात देण्यात येणार आहे.
हेही वाचा – गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
२०२३ – २४ या वर्षासाठी उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार विधानसभा श्रेणीतून शिवसेनेचे रमेश बोरनारे, काँग्रेसचे अमीन पटेल, भाजपचे राम सातपुते तर विधान परिषद श्रेणीतून राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, भाजपचे गोपीचंद पडळकर रमेश पाटील यांना मिळाले. तसेच उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार काँग्रेसचे कुणाल पाटील, भाजपच्या श्वेता महाले व राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांना जाहीर झाला. अन्य पाच वर्षांचे पण पुरस्कार जाहीर झाले आहेत. आमदार समीर कुणावार यांना २०२२ – २३ या वर्षासाठी उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.