नागपूर : नागपूर जिल्ह्याचे पुत्र, माजी खासदार, माजी मंत्री व ज्यांची ओळख ज्ञानयोगी अशी होती,असे दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जीवनावर आधारित एका धड्याचा समावेश अभ्यासक्रमात असावा म्हणून एका पश्चिम महाराष्ट्रातील युवा आमदारांने पुढाकार घेतला आहे. देशातील सर्वाधिक शिकलेले व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. श्रीकांत जिचकार यांची ओळख आहे. जिचकार यांच्या जीवनपटावरील धडा महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबें यांनी जयहिंदलोकचळवळीच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री डॉ. दीपक केसरकर यांच्याकडे केली.

डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याकडे डॉक्टर, वकील, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या वीसपेक्षा अधिक पदव्या आहेत. डॉ. श्रीकांत जिचकार यांचा धडा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश होण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात आली होती. या स्वाक्षरी मोहिमेत एक लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. देशात सर्वात जास्त शिकलेला नेता म्हणून डॉ. श्रीकांत यांची ओळख आहे.

local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
grandparent educational group formed by Prashant Bhoyer training grandparents and grandchildren together in school
आजी आजोबांसोबत शिक्षण: युवा शिक्षकाचा अफलातून प्रयोग
Nagpur University, Nagpur University Student Assistance Fund, Student Assistance Fund,
विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार, ‘या’ विद्यापीठाने सुरू केली योजना
Vocational Education, Ashram Schools, students,
आश्रम शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी सामंजस्य करार – सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लाभ

हेही वाचा…वर्धेतून काँग्रेसच लढणार; कोणी दिली ही हमी? वाचा सविस्तर…

आतापर्यंत त्यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. त्यांना भारतातील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती देखील म्हटले जाते. लिम्का बुकमध्ये ही त्यांच्या नावाचा उल्लेख भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून आहे. ४२ विद्यापीठात शिकले असून २० पेक्षा जास्त पदव्या त्यांच्याकडे आहेत. जिचकार वयाच्या २६ व्या वर्षी देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता. ते महाराष्ट्राचे शक्तिशाली मंत्रीही म्हणून देखील त्यांनी काम केली. पुढे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि राज्यसभेवरही खासदार म्हणून काम पार पाडले. युनेस्कोमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

हेही वाचा…

जिचकार यांच्या कार्याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांना माहित हवी!

शिक्षणमंत्री जनभावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घेतील. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांला व्हावी, यासाठी जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. – आमदार, सत्यजीत तांबे.

Story img Loader