आरोग्यमंत्र्यांसह शिक्षण विभागाच्या सचिवाकडे तक्रार

चंद्रपूर: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभा प्रमुखाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी राजुरा मतदारसंघात दौरे वाढिवले आहे. भोंगळे यांनी नवरात्रीचे निमीत्ताने राजुरामध्ये ‘‘दादांचा’’ दांडिया हा उपक्रम सुरू केला. उपजिल्हा रूग्णालयाला लागून असलेल्या जिल्हा परिषदेेची शाळेत हा कार्यक्रम सुरू असल्याने दांडीयाच्या कर्कश व अतितिव्र आवाजामुळे रूग्णालयातील लहान बाळांपासून, गरोदर माता,व अनेक वयोवृध्दांना मोठा त्रास होत असल्याची बाबत आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे भोंगळे व धोटे आमने-सामने आले आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

राजुरा येथे उपजिल्हा रूग्णालयाला लागून जिल्हा परिषदेेची शाळा आहे.या शाळेला शंभर वर्षाची पंरपरा आहे. शाळेच्या पटांगणावर देवदाव भोंगळे यांच्या पुढाकारातून दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी रात्री दांडिया चा कार्यक्रम घेण्यात येत आहे. दांडीयाच्या कर्कश व अतितिव्र आवाजामुळे रूग्णालयात भरती असलेल्या लहान बाळांपासून, गरोदर माता, व अनेक वयोवृध्दांना मोठा त्रास होत असल्याचे नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला आहे.

हेही वाचा >>> जागा मिळवण्यासाठी दोन दिवस आधीच भाविक सभामंडपात! कोण आहे पंडित प्रदीप मिश्रा?

उपजिल्हा रूग्णालय परिसर संवेदनशिल आहे. शासकीय जागा वापराची परवानगी खाजगी कार्यक्रमाला मुख्याध्यापकाने दिलीच कशी हा प्रश्न उपस्थित करित आमदार सुभाष धोटे यांनी याप्रकाराची तक्रार थेट आरोग्यमंत्राकडे केली आहे. रूग्णांच्या सुऱक्षेची बाब लक्षात घेता येथे हेात असलेला दांडीया कार्यक्रम रदद करण्याची मागणी धोटेंनी केली आहे. शाळा स्वतच्या मालकीची असल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी दांडीया महोत्सवाला परवानगी दिली.

हेही वाचा >>> “गडकरींचे व्यक्तिमत्त्व राज कपूरसारखे, छोटे स्वप्न… ”, काय म्हणाले फडणवीस?

परवानगी देतांना शाळा व्यवस्थापन समिती व शहरातील कुठल्याही गणमान्यांना विचारात न घेता त्यांनी स्व:त हा निर्णय घेेतला. त्यामुळे धोटे प्रंचड संतापले असून त्यांनी मुख्याध्यापकाच्या भुमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवित मुख्याध्यापकाची तक्रार शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाकडे केली आहे. दांडियामुळे आमदार सुभाष धोटे व देवराव भोंगळे आमनेसामने आले आहेत.या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Story img Loader