गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षक कार्यालयात समस्यांबाबत गेले असता अधिकारी, कर्मचारी समस्या मनावर घेत नाहीत. याबाबत शिक्षकांच्या अनेक तक्रारी आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर आमदार अडबाले यांनी बैठक लावून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व इतकेच नाही तर प्रलंबित प्रकरणे एका महिन्याच्या आत निकाली काढण्याची तंबीही दिली. विशेष म्हणजे, ही समस्या निवारण सभा तब्बल साडेसहा तास चालली.

शिक्षकांच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील ही महत्वाची सभा झाल्याचे मत शिक्षक व्यक्त करीत आहे. नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी अडबाले यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्‍या ‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘विमाशि’च्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी गोंदिया जिल्हा परिषदेतील सभागृहात समस्‍या निवारण सभा सोमवारी पार पडली. या समस्‍या निवारण सभेत टप्पा अनुदान वाढबाबत चर्चा करणे, वन हेड वन व्हाउचर योजना गोंदिया जिल्ह्यात कार्यान्वित करणे, प्रलंबित वैद्यकीय देयके, वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी फरकाची देयके, जीपीएफ परतावा/ ना परतावा देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रदान देयके, कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तिका देणे, प्रलंबित वरिष्ठ / निवड श्रेणी बाबत चर्चा करणे, वेतन दरमहा एक तारखेला अदा करणे, जीपीएफ/एनपीएस पावत्या वितरणाची सध्यस्थिती, सहाव्या – सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते, संच मान्यता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्त प्रस्ताव, सेवानिवृत्ती उपदान बाबत चर्चा करणे व इतर अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. सोबतच अनेक वैयक्तिक प्रकरणांवर चर्चा करून वैयक्तिक व सामूहिक प्रकरणे २० जुलैच्या आत निकाली काढण्याचे शिक्षण विभागास आमदार सुधाकर अडबाले यांनी आदेश दिले. व एका महिन्यानंतर याच विषयावर आढावा बैठक घेणार असल्याचे आमदार अडबाले यांनी निर्देश दिले.

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Nandurbar teacher was extorted Rs 12 lakh after being trapped in pornographic film
नंदुरबारमधील शिक्षकाला मोहजाळात अडकवून १२ लाख रुपयांची मागणी
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

हेही वाचा >>>चंद्रपूरमध्ये ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न

यावेळी गोंदिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य.) कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथ.) महेंद्र गजभिये, विमाशि संघाचे जिल्‍हाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, जिल्‍हा कार्यवाह संदीप मांढरे, उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, विदर्भ शिक्षक संघाचे रेशीम कापगते, सुनील आवळे, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विमाशी संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader