राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता
नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन अध्यक्षाची नेमणूक करुन गटबाजीला वाव मिळू नये म्हणून या निवडणुका होईफर्यंत आमदार विकास ठाकरे यांनाच नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र काँग्रेसने घेतला आहे.
हेही वाचा >>> गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल नेमके कोणाचे? राज्यसभा मतदानासाठी भाजप- शिवसेनेकडून दावे-प्रतिदावे
काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरात एका व्यक्तीने पाच वर्षांपेक्षा पक्षाच्या पदावर अधिक काळ पदावर राहू नये, असा ठराव केला होता. त्या ठरावाची अंमलबाजवणी करीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आमदार विकास यांनी कांग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यासंदर्भातील घोषणा शिर्डी येथील चिंतन शिबिरात करण्यात आली. परंतु विकास ठाकरे यांना काळजीवाहू शहराध्यक्ष म्हणून महापालिकेच्या आगमी निवडणुकापर्यंत कामय ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष आपल्या स्तरावर घेतील आणि तसा प्रस्ताव अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> राज्यसभा निवडणूक : ‘वर्षा’वर हालचालींना वेग, सपाचे दोन आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!
विकास ठाकरे गेल्या आठ वर्षांपासून शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासह दोन आमदार निवडून आले होते. शिवाय ठाकरे यांनी गटबाजीला फार महत्त्व न देता आक्रमकपणे पक्ष संघटना बांधली. केंद्रात आणि राज्यात सरकार नसतानाही पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाना पटोले यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घेतला आहे. पटोले स्वत: नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडूक लढले होते.
हेही वाचा >>> आजच्या सभेत केवळ गाजरं उधळण्यापलीकडे काहीही होणार नाही – उद्धव ठाकरेंच्या सभेवरून भाजपाची टीका!
त्यामुळे पटोले यांना महापालिका निवडणुकीपर्यंत ठाकरे अध्यक्ष हवे आहेत. नवीन अध्यक्षाला नवीन टीम तयार करणे आणि सर्व गटांशी जुळवून घेऊन निवडणुकीला सामोरे जाणे अवघड जाईल. ते पक्षाच्या हिताचे ठरणार नाही. विशेषत: जेथे केंद्रीय मंत्री गडकरी आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे वास्तव आहे; त्या ठिकाणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष बदलणे योग्य नसल्याचे काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> विरोधकांचं जे तोंड आहे ते तोंड नसून गटार आहे – शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर
प्रतिस्पर्ध्यांचा हिरमोड
ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने त्यांचे पक्षांतर्गंत प्रतिस्पर्धी सुखावले होते. परंतु निवडणुकीपर्यंत त्यांना कायम ठेवणार असल्याने त्यांचा हिरमोड होणार आहे. शहराध्यक्षपदासाठी नागपुरातील तीन नेत्यांनी मंत्र्याच्या माध्यमातून प्रयत्न चालवले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष नागपूरची स्थिती जाणून असल्याने ठाकरे विरोधकांना महापालिका निवडणुका होईस्तोवर शस्रे म्यान करावे लागणार आहेत.