नागपूर : ठाण्यातील घोडबंदर सेवा रस्त्याचे काँक्रिटीकरण, रायलादेवी तलावाचे शुशोभीकरण, वालधुनी नदीस समांतर २४ मीटर रुंदीचा रस्ता, अशा सुमारे १३०० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ‘एमएमआरडीए’ची बैठक झाली. दुग्धविकास विभागाची कुर्ला येथील सुमारे १०.४६ हेक्टर आणि वरळी येथील ६.४० हेक्टर जमीन विनामोबदला प्राधिकरणास हस्तांतरित करून त्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएमआरडीए’ची नियुक्ती करण्याची राज्य सरकारला विनंती करणारा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्राधिकरणामार्फत विकासक म्हणून राबविण्यास मान्यता देण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात आली आहे.
ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या दुहेरी बोगद्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली. ठाणे शहरातील रायलादेवी तलावाचे ६०.२४ कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ठाणे-घोडबंदर मार्गावर कापूरबावडी ते गायमुखदरम्यान मुख्य व सेवा रस्त्याचे विलिनीकरण करून क्रॉक्रिटीकरणासाठी ५५९.२७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मेट्रोच्या ठाणे आणि परिसरातील विविध मेट्रो मार्गिकांसाठी मोगरपाडा येथे कारशेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्यातील अधिकृत शेतकऱ्यांना २२.५ टक्के आणि अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना १२.५ टक्के विकसित जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मुंबई महापालिकेची पुन्हा चौकशी; तीन सदस्यीय समितीची राज्य सरकारकडून घोषणा
विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत डोंबविली व भिवंडी शहरांना जोडणाऱ्या मानकोली-मोठागाव जोडरस्ता व राष्ट्रीय महामार्गादरम्यान तयार होणाऱ्या जंक्शनवर ५७.६७ कोटी रुपयांचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मुरबाड रोड, बदलापूर रोड आणि पुणे लिंक रोड यांना जोडणारा वालधुनी नदीस समांतर असा २४ मीटर रुंदीचा रस्ता व त्यावरील दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी ६४२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. कर्जत ते हाळ फाटा रस्त्याच्या कामासाठी भू संपादनाकरिता १०० कोटी, मुंबई- गोराई रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या खाडी पूल आणि पोहोच रस्त्यासाठी ८८८. ८४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
मेट्रो मार्ग-२ ब डीएन नगर ते मंडाळी या मार्गिकेवरील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक रद्द करण्यात आले आहे. मेट्रो मार्ग-४ वडाळा- घाटकोपर-ठाणे- कासारवडवली या मार्गिकेवरील सुमन नगर व अमरमहल जंक्शन मेट्रो स्थानक वगळण्यात आले आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिका-१२ प्रकल्पासाठी आता पिसावे ऐवजी निळजेगाव येथे शासकीय जमिनीवर कारशेड उभारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वल्सा नायर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवा भुयारी मार्ग
मुंबईत प्रू्व मुक्त मार्ग आणि सागरी किनारा मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑरेज गेट ते मरीन ड्राईव्ह सागरी किनारा मार्गादरम्यान हा मार्ग तयार करण्यात येणार असून, त्यासाठी निधी उभारण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.