महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली. पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री दालनात भेट झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंचं स्वागत केलं. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड काही वेळ चर्चाही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण मागील काही दिवसांत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा एकमेकांची भेट घेतली आहे. आता पुन्हा नागपुरात ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा- “मनसेचं हेच पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवणार”, पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरे यांनी आज नागपुरात केलेल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसला राजकीयदृष्ट्या स्थिर होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आता मनसेचे पोट्टेही येत्या काळात विरोधकांवर वरवंटा फिरवणार आहेत, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. येथील भाषणानंतर राज ठाकरे यांनी नागपूर विधानसभेच्या मुख्यमंत्री दालनात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अजित अभ्यंकर आदी नेते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray meeting with cm eknath shinde rmm
Show comments