नागपूर : विधिमंडळ अधिवेशन नागपुरात सुरू असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले.मनसैनिकांच्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्याना पदापेक्षा व्यक्तीला किती महत्त्व असते याबाबतचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी चौदा वर्षाचा होते त्यावेळी एक दिवस मातोश्रीवर गेलो. साधारणत: ७२-७३ ची घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्री वरुन शिवसेना भवनला जायचे होते. मात्र त्यावेळी त्यांच्या वाहनाचा चालक कुठेतरी बाहेर गेला होता. बाळासाहेब संतापले आणि त्यांनी लगेच टॅक्सी मागवली. बाळासाहेब मातोश्रीच्या आले आणि त्याचवेळी असलेले मुंबईचे तत्कालीन महापौर . सुधीर जोशी लाल दिव्याच्या गाडीत मातोश्रीवर आले. बाळासाहेब बाहेर उभे असल्यामुळे तुमच्याशी बोलायचे आहे म्हणून सुधीर जोशी यांनी बाळासाहेबांना सांगितले. बाळासाहेब पुन्हा जोशी यांना आतमध्ये घेऊन गेले.

हेही वाचा: राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

मातोश्रीमध्ये दहा मिनिटे दोघांची चर्चा झाल्यानंतर बाळासाहेब बाहेर आले आणि टॅक्सीत जाऊन बसले. तेवढ्यात सुधीर जोशी यांनी माझ्या गाडीने शिवसेना भवनात सोडून देतो म्हणून बाळासाहेबांना विनंती केली. मात्र बाळासाहेब लाल दिव्याच्या गाडीत न बसता ते टॅक्सीतच बसले आणि त्यांना तुम्ही तुमच्या गाडीत बसा असे सांगितले. त्यावेळी मी बाळासाहेबांच्या बाजूला बसलो होतो आणि टॅक्सी शिवसेना भवनाच्या मार्गाने निघाली. आमची टॅक्सी समोर आणि मागे लाल दिव्याची गाडी होती. ताकद कशाला म्हणतात हे चित्र मी त्यावेळी बघितले आणि तेच संस्कार माझ्यावर झाले आहे. मात्र तुम्ही मला आता टॅक्सीत बसवू नका असे सांगत कार्यकर्त्याना पदापेक्षा व्यक्तीला किती महत्त्व असते हे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray visit to nagpur during and he told a story to the workers from his childhood in nagpur vmb6 7 tmb 01
Show comments