नागपूर : उशिरा का होईना मनसेने विदर्भाकडे लक्ष देणे सुरू केले आहे. राज ठाकरे येऊन गेले. मुंबईतील नेते पक्ष बांघणीसाठी दौरे करीत आहेत. मात्र त्यातून काही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने नेत्यांचा तोल सुटतो की काय असे वाटायला लागले आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींवर व्यक्त केलेला संताप हा त्याचेच द्योतक मानला जात आहे.
हेही वाचा >>>सावधान… उपराजधानीत मुलांमध्ये हात, पाय, तोंडात कांजण्यासदृश्य पुरळ !
पदाधिकारी नियुक्त करण्यास विलंब का लागतो आहे या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे हे मंगळवारी नागपुरात पत्रकार परिषदेत जाम भडकले. त्याला संदर्भ होता, माध्यमांनी या संदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्ताचा. मनसेला पदाधिकारी मिळत नसल्याने नियुक्त्या रखडल्या याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत देशपांडे यांना विचारले असता, ते म्हणाले, किती दिवसात नियुक्त्या करायच्या हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्या पद्धतीने नेमणुका करू. आम्हाला माहिती आहे किती दिवसांनी नेमणुका करायच्या. पण ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात ते चुकीचे आहे. पदाधिकारी मिळत नाही म्हणून नेमणुका करीत नाही, असे लिहिताना आमची बाजू मांडली जात नाही ही गोष्ट आक्षेपार्ह आहे. आणि ते चांगल्या पत्रकारितेला धरून नाही.
हेही वाचा >>>नागपूर : विज्ञानाचा जागर करण्यासाठी झाडांची कत्तल !
आम्हाला न विचारता तुमच्या मनाला येईल, त्या बातम्या करणार आहात काय. तुम्हाला बातम्या छापण्याचा अधिकार आहे तसा आम्हाला आमचा निषेध नोंदवण्याचा अधिका आहे. लोकशाहीच्या स्तंभाने जबाबदारीने वागले पाहिजे, असा संतापही देशपांडे व्यक्त केला.