बुलढाणा : शेगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आढावा बैठकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला. उमेदवार ‘रेल्वे इंजिन’ असे यावेळी सांगण्यात आले असून नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले.
संत नगरीतील हॉटेल साई गजाननमध्ये मंगळवारी दुपारी १ वाजता सुरू झालेली ही बैठक संध्याकाळी उशिरा पार पडली. माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बुलढाणा लोकसभाची निवडणूक लढण्याच्या निर्णयावर विचारमंथन करण्यात आले. पक्षाचा उमेदवार रेल्वे इंजिन असल्याचे सांगून ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यादृष्टीने मतदारसंघात पक्षसंघटन वाढविण्याच्या सूचना नेत्यांनी केल्या. बुलढाणा मतदारसंघात मनसेसाठी अनुकूल स्थिती असून अंतिम निर्णय ‘शिवतीर्था’वर होणाऱ्या बैठकीत करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा – अमरावती : बडनेरा-नाशिक विशेष मेमू गाडीला मुदतवाढ
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मदन गायकवाड, शेतकरी सेनेचे प्रदीप भवर शैलेश गोंधने, मनविसेचे शैलेंद्र कापसे, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, शहराध्यक्ष अमित देशमुख, यांच्यासह तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संचलन विनोद टिकार तर रवींद्र उन्हाळे यांनी आभार मानले.