amol mitkari : अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी मनसैनिकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. जय मालोकार (२४) असे मृतक मनसैनिकाचे नाव आहे. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन करून दबाव आणल्याने मनसैनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या ‘सुपारीबहाद्दरां’नी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची आज अकोल्यात तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

हेही वाचा…“…तर अमोल मिटकरींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” मनसेचा इशारा; “होणाऱ्या परिणामाला…”

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात मनसैनिक जय मालोकार यांचा सहभाग होता. वाहन तोडफोड आंदोलन प्रकरणात पोलिसांनी पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये जय मालोकार यांचा देखील सहभाग होता. आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मनसैनिक जय मालोकार प्रचंड तणावात आले. या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका मंगळवारी रात्री आला. उपचारासाठी त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मनसैनिक जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली. जय मालोकार यांचे होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण सुरू होते. मनसेचे आंदोलन व त्यानंतर पोलीस कारवाईचा दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप होत आहे. मनसैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूला आमदार अमोल मिटकरी जबाबदार असल्याचा आरोप पंकज साबळे यांनी केला आहे. जय मालोकार यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून शहरात शोककळा पसरली आहे.