भंडारा: पँटच्या खिशातील मोबाईलमधून अचानक धूर निघू लागला. याची जाणीव होताच १२ वर्षीय मुलगा थोडा घाबरला, पण क्षणाचाही विलंब न करता त्याने मोबाईल खिशातून काढून बाहेर फेकला अन् जोरदार स्फोट झाला. तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर परिसरात ही थरारक घटना घडली. नशीब बलवत्तर म्हणून मुलाचे प्राण वाचले.

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या प्रीतम किशोर वाघरेच्या वडिलांचे चांदपूर येथील हनुमान मंदिर देवस्थानाच्या आवारात पूजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने प्रीतम नेहमीप्रमाणे वडिलांच्या दुकानात गेला. जाताना वडिलांचा वीवो कंपनीचा मोबाईल त्याने पँटच्या खिशात टाकला अन् दुकानाकडे निघाला. दुकानाजवळ पोहोचल्यानंतर त्याला पँटच्या खिशातून धूर निघत असल्याचे लक्षात आले.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

हेही वाचा… चंद्रपूर : बालरोग चिकित्सा विभागात साहित्य खरेदीत लाखोंची उधळपट्टी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण, चौकशीची मागणी

खिशात ठेवलेल्या मोबाईलमधून धूर निघत असल्याची जाणीव होताच प्रीतमने खिशात हात घालून तातडीने मोबाईल बाहेर काढला आणि फेकला. मोबाईल खिशातून बाहेर काढताच त्याचा स्फोट झाला. यामुळे तो थोडक्यात बचावला. मात्र, पँटच्या खिशात मोबाईलने पेट घेतल्याने त्याच्या पायाला जखम झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला मदत करून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, मोबाईलचा स्फोट झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.