लोकसत्ता टीम
नागपूर : डिसेंबर २०११ मध्ये शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत राष्ट्रवादी मासिकात प्रकाशित झाली होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. देशाच्या कृषी क्षेत्रात शरद पवार साहेबांच्या योगदानाचा उल्लेख केला. पण गुजरातच्या कृषी क्षेत्रात शरद पवार यांनी काय योगदान दिले हे सुद्धा या मुलाखतीत मोदी यांनी सांगितले आहे. मात्र, गुरुवारी शिर्डी येथील एका कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात काहीच योगदान नसल्याचे म्हटले आहे.
तसेच शरद पवार यांना ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांच्याबद्दल कोणत्याही सत्याचा विपर्यास न करता मी ऐवढेच म्हणेन “ वे विकास के प्रति प्रतिबध्द है | वर्तमान में राजनितीक क्षेत्र में जो छुआछुत का माहौल प्रवेश हुआ है उससे वो पुरी तरह परे है | वो सबको स्वीकार करते है ये बहुत बडी बात है | कृषी, किसान और गाँव के विकास के प्रति उनका लगाव है | उनका हर कदम उस ही दिशा में दिखाई देता है |”
आणखी वाचा-नागपूर : अख्ख्या तपास पथकाची तडकाफडकी बदली; कर्तव्यात दिरंगाई, हलगर्जीपणा भोवला
असे मोदी यांनी म्हटले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यासंदर्भातील चित्रफिती समाजमाध्यांवर टाकली असून पंतप्रधान मोदी त्यावेळी खोटे बोलत होते की आता खोटे बोलत आहेत, असा सवाल पत्रकार परिषदेत केला.