गोंदिया : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोंदिया शहराचे जावई. त्यांची पत्नी साधना यांचे गोरेलाल चौकात माहेरघर. २००५ पासून शिवराजसिंह यांची मुख्यमंत्रिपदी निवड वा शपथविधी होत असताना त्यांच्या सासरी गोरेलाल चौक ते दुर्गा चौक या परिसरात सुमारे चार ते पाच तास फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात कुटुंबीयांचे नृत्य, आप्तस्वकियांकडून मिठाईचे वितरण, आदी जल्लोष साजरा केला जात असे. पण, सोमवारी (दि. ११) संध्याकाळी भोपाळ येथे भाजपा विधिमंडळ बैठकीत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी उज्जैन येथील मोहन यादव यांची निवड करण्यात आली अन् शिवराजसिंह यांच्या सासरवाडीत निराशा पसरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून काल संध्याकाळपर्यंत शिवराजसिंह यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दिवसाकाठी ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सोमवारी यावर पडदा पडला अन् आपले जावईबापू पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, ही मसानी कुटुंबियांची आशा निराशेत परावर्तीत झाली.

हेही वाचा – यवतमाळ : संजय राऊतांविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रकरण

हेही वाचा – अनिल परब यांनी कोणाला वाहिली श्रद्धांजली, विधान परिषदेत गदारोळ

काय म्हणाले नातेवाईक?

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजेच २३० पैकी १६२ जागा जिंकल्या. भाजपाच्या विजयात शिवराजसिंह यांची महत्त्वाची भूमिका होती. यामुळे तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. यामुळे काहीशी निराशा आहे, असे मसानी कुटुंबातील एका सदस्याने सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan yadav from ujjain was elected as the cm of madhya pradesh and there was disappointment in shivraj singh in laws in gondia sar 75 ssb