अकोला : मोहनदास करमचंद गांधी हे मुस्लीम पुत्रच असल्याचा पुनरुच्चार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अकोल्यात बोलताना केला. यासंदर्भातला उल्लेख असलेल्या पुस्तकातील उताऱ्याचे वाचन त्यांनी व्याख्यानात केले. करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे मोहनदास हे पुत्र आहेत. त्या पत्नीला मुस्लीम जमीनदाराने पळवून नेले होते. लव्ह जिहाद आणि त्यात काही फरक नाही, अशी वादग्रस्त टीका भिडे यांनी केली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अकोला विभागाद्वारे रविवारी सायंकाळी ओम मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी मुस्लीम धर्माविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली. हिंदुस्थानावर खूप आक्रमणे झाली आहेत. अनेक टोळ्यांनी ५०० वर्षे गोंधळ घातला. जगात ५२ मुस्लीम राष्ट्रांपैकी ३९ देशांनी हिंदुस्तानावर आक्रमण केले आहे. ते स्वतःच्या जन्मदात्रीलादेखील आई मानत नाहीत, अशी वादग्रस्त टीका भिडे यांनी केली. ‘हिंदू देहाने जिवंत आहेत, पण मनाने मेलेले आहेत, हेच खरे दुर्दैव आहे. हिंदूंनी स्वदेशी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही.

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ

हेही वाचा >>> “भाजपा आणि भिडेंचं साटंलोटं आहे, हे आता सिद्ध झालं”, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

स्वदेशी बाणा आत्मसात करण्याची गरज खरी गरज आहे. विदेशी उत्पादनांचे बाजारपेठेवर वर्चस्व आहे. ते देश लुटत आहेत. इंग्रज व्यापार करण्याच्या दृष्टीने आले. योजनापूर्वक त्यांनी देशावर कब्जा मिळवला. १७५ वर्षे इंग्रजांनी देशाचा अभ्यास केला होता. स्वदेशी बाणा स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.  आपल्याला देशाचा टोकाचा अभिमान असल्याशिवाय हे घडणार नाही. हिंदूंमध्ये राष्ट्रीयत्वाचे कण कमी आहेत,’ असेही भिडे म्हणाले.

हेही वाचा >>> सोलापूर: गांधीजींचा अभिमान वाटत नसल्यास संभाजी भिड्यांनी देशातून चालते व्हावे; आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी

चुकीच्या नीतीमुळे भारत-चीन युद्ध घडले. ५९ हजार सैनिक मारले गेले. या युद्धाला ६१ वर्षे होत आहेत. दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणूक होते. १२ लोकसभा निवडणुकांमध्ये चीनने घेतलेली जमीन वापस काढून घेण्याचा मुद्दा उचलावा, असे कुणालाही वाटले नाही, अशी टीका भिडे यांनी केली. मॉ जिजाऊ यांनी १४ वर्षे शिवबाला सर्वांगीण संस्कार दिले. दादाजी कोंडदेव युद्धनीतीचे धडे दिले. शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले. अडीचपट हिंदवी स्वराज्य वाढवले. त्यांचा आदर्श ठेवून हिंदूंनी एकत्रित होऊन राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, पती, पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने जन्म घेतो, पत्नी स्वतःच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेते, या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

Story img Loader