Shikshak Din 2023 : आज शिक्षक दिनानिमित्त ठिकठिकाणी कुशल शिक्षकांचा गौरव होईल. नियमित शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविणारे काहीच आपल्या पेशास जागत वेगळे काही देण्याचा प्रयत्न करतात. मात्र अद्याप सरकारी दृष्टीस न पडलेल्या विद्यार्थ्यास व त्यांना कोणतेही वेतन न घेता शिकविणाऱ्या शिक्षकास आठवावे लागेल. मोहित सहारे हा तो युवा शिक्षक आहे.

वर्धा शहरातील राष्ट्रसंत चौकात वडार झोपडपट्टी आहे. जिथे पालकच शिक्षण वंचित म्हणून मुलंपण पटसंख्येत नसणारी. दारूच्या घमघमाटात सकाळ सुरू होत असलेल्या वातावरणात मोहित येथील मुलांना एका कोपऱ्यात घेवून बसतो. अक्षरांचा ओनामा गिरवितो. यांचीच काही भावंडे शाळेत जायला लागली आहे. पण ही काही विविध कारणांनी घरीच आहे. त्यांना घरून काढत जगाचा परिचय करून दिल्या जातो. फूटपाथ स्कूल म्हणून हा उपक्रम ओळखल्या जात आहे. मुलं बऱ्यापैकी शिकू लागली आहेत. करोना काळात काही कुटुंबातील रोजगार, मजुरी कामे गेली. तेव्हा याच मुलांनी किरकोळ वस्तू विकत कुटुंबास हातभार लावला. हे मोहित यांचेच संस्कार. किमान मुळाक्षरे गिरवून या मुलांना वाचता यायला हवं, हा उद्देश असल्याचे सहारे सांगतात. त्यांचे आधारकार्ड तेच काढून देतात.

हेही वाचा – उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’चे ५ बळी

हेही वाचा – सूनेचे डोके भिंतीवर आपटले; सासूविरोधात गुन्हा

पुढे यातील अधिकाधिक मुले मुख्य प्रवाहातील शाळेत जातील यासाठी प्रयत्न असतो. ३० ते ४० मुलं गत पाच वर्षांपासून इथे हजेरी लावत आहेत. या कामात विविध लोकं सहकार्य करीत असतात. पण प्रामुख्याने डॉ. उदय मेघे यांची मदत विसरता येत नाही, असे सहारे आवर्जून नमूद करतात. त्यांच्या मोबाईलची ट्युन बरेच सांगून जाते, वैष्णव जन तो तेणे कहीये…

Story img Loader