नागपूर : पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या वातानुकूलित (एसी) डब्यामध्ये कोच अटेंडेंटने नऊ वर्षांच्या बालीकेशी शौचालयात अश्लील चाळे केल्याने संतप्त प्रवाशांनी अटेंडेंटला चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी बुटीबोरी रेल्वे स्थानकाच्या आसपास घडली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपी मोहम्मद मन्नू (३०) रा. चाकण, गया यास अटक केली आहे.

मुन्नू रेल्वेत नऊ वर्षांपासून एका खासगीमार्फत कोच अटेंडेंट आहे. एसी बोगीतील प्रवाशांना चादर, ब्लॅकेट देणे, ते गोळा करण्याचे त्याचे काम आहे. एक चिमुकली तिची आई, आजी आणि भाऊ यांच्यासोबत एसी बोगीतून प्रवास करीत होती. हे कुटुंब पाटण्याला जात होते. बुटीबोरीजवळ असताना चिमुकली लघुशंका करायला शौचालयात गेली. बराचवेळ लक्ष ठेवून असलेला मुन्नूदेखील तिच्यापाठोपाठ शौचालयात शिरला आणि आतून कडी लावली. ती घाबरली, त्याने चिमुकलीशी अश्लील चाळे केले. दार उघडताच ती रडत रडत आईकडे गेली आणि झालेला प्रकार सांगितला.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Meenakshi Seshadri Romantic rain song while she having diarrhea
सेटवर एकच शौचालय, पावसात रोमँटिक गाण्याचं शूटिंग अन्.., मीनाक्षी शेषाद्रीने सांगितला अतिसार झाल्यावर चित्रीकरणाचा वाईट अनुभव
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

हेही वाचा – नागपूर : भाजपच्या मंदिर स्वच्छतेत नवरदेवही सहभागी

हेही वाचा – “रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, आता सत्ताधारी आदिवासींबाबतीत भेदभाव करतात”, जितेंद्र आव्हाड असे का म्हणाले?

आई आणि आजीने बोगीतील प्रवाशांना या प्रकाराची माहिती दिली. संतापलेल्या प्रवाशांनी आरोपीला पकडून मारहाण केली. तसेच या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. लोहमार्ग पोलिसांचे पथक क्रमांक एकच्या फलाटावर आले. पीडित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.