नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी १०.३० लाखांची रक्कम पळवल्याची घटना ताजी असतानाच हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूपासून काही अंतरावर कोतेवाडा शिवारात दोन व्यापाऱ्यांचे दोन कोटी रुपये लुटण्यात आल्याने जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही व्यापारी कारने सुरतच्या दिशेने जात होते. तर दुसऱ्या कारने पाठलाग करणाऱ्या तीन लुटारूंनी व्यापाऱ्यांना कोतेवाडा शिवाराजवळ अडवले. त्यानंतर आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याजवळची दोन कोटी रुपयांची बॅग हिसकावली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. ही माहिती परिसरात कळताच तेथे खळबळ उडाली. तातडीने पोलिसांसह इतरही यंत्रणांना माहिती दिली गेली.

हेही वाचा – राज्यातील पावणेदोन लाख घरात केंद्राच्या ‘सूयोदय’ची सौरऊर्जा

घटनेचे गांभीर्य बघत हिंगणा पोलीस स्टेशनचे पथक मध्यरात्रीपासून आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान दोन्ही व्यापाऱ्यांकडे तब्बल २ कोटी रुपयांची रोख रक्कम आली कुठून? याचीही माहिती पोलीस घेत आहे. या प्रकरणात हिंगणा ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांची चमू वेगवेगळ्या दिशेने आरोपींचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहे. दरम्यान नागपूर ग्रामीणमधील सावनेरमध्येही दोन दिवसांपूर्वी स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून तब्बल १० लाखांहून जास्तची रक्कम लुटण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत तब्बल २ कोटी रुपये महामार्गावर लुटण्यात आल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा – ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, “वंचितचा समावेश अद्याप ‘मविआ’त नाही, भाजपा व संघविचारसरणी विरोधात…”

रक्कम ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची?

महामार्गावर लुटण्यात आलेली रक्कम ही ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची असल्याचे प्राथमिक दृष्ट्या सांगण्यात येत आहे. पण पोलिसांच्या चौकाशीतच नेमकी माहिती स्पष्ट होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money looted from traders in nagpur district incident in hingana police area mnb 82 ssb
Show comments