चंद्रपूर : वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हाणी, शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावालगतच्या जंगलाला कुंपण करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आ. शोभा फडणवीस यांनी राज्य सरकारकडे लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून राज्य सरकारने आदिवासींच्या ८ गावालगतच्या जंगलाला कुंपण करण्यासाठी ६ कोटी ६ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
हेही वाचा… ‘एमपीएससी’ची उत्तरतालिका जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत हरकती नोंदवता येणार
हेही वाचा… नागपूर: केसीआर यांच्या बीआरएसचा संघभूमीतून शड्डू; राज्यातील पहिले कार्यालय नागपुरात, उद्या उद्घाटन
जंगलातील वाघ व इतर वन्यप्राणी गावात येण्यास सुरूवात झाली आहे. वाघ व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. एका वषार्ंत ६० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच वन्यप्राण्यामुळेसुध्दा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्या नेतृत्वात नागरिकांना जंगलातील वाघ गावात येणार नाही यासाठी जंगलाला जाळीचे कुंपण करण्याची मागणी केली होती. ही मागणी फडणवीस यांनी राज्य सरकारकडे लावून धरली. माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्या मागणीला यश आले असून ८ गावालगतच्या जंगलाला कुंपन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६ कोटी ६ लाख रूपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ८ गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.