श्रीसूर्या, वासनकरसारख्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) जप्त केलेला मुद्देमाल आता राष्ट्रीयीकृत बँकेच्या ‘लॉकर’मध्ये ठेवण्याचा निर्णय नागपूर पोलीस विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सुरक्षित राहील, असा विश्वास पोलीस विभागात व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहरात आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय सीताबर्डी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यांच्या मालखान्यात घडलेल्या प्रकारांवरून गुन्हे शाखेने विभागाचे हित आणि मुद्देमालाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत २०१२ साली झालेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला माल मालखान्याचा रखवालदार असलेल्या पोलीस हवालदाराने दारू आणि जुगाराच्या व्यसनात लांबविले. त्यामुळे संबंधित व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांना दंड बसला आणि संबंधित व्यक्तीला १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली.
संबंधित हवालदाराने सर्व संपत्तीही जुगार आणि दारूच्या व्यसनात उडविल्याने पंधरा लाखाच्या वसुलीतही अनेक अडचणी येत आहेत. पंधरा लाखांपैकी आतापर्यंत केवळ अडीच लाखांपर्यंत वसूल करण्यात आले. तर दीड वर्षांपूर्वी गणेशपेठ पोलीस ठाण्यातून मालखाना प्रमुखाने एका सराफा व्यावसायिकांकडून जप्त केलेला माल परस्पर लंपास केला.
या घटनांमधून गुन्हे शाखा विभागाने धडा घेऊन दोन महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या नावाने एका राष्ट्रीयीकृत बँकेत लॉकर खाते उघडण्यात आले. खाते उघडल्यापासून आर्थिक गुह्यांसंदर्भात जप्त करण्यात आलेला माल लॉकरमध्ये ठेवण्यात येते. पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईतील माल पोलीस ठाण्यांच्या मालखान्यातील आलमारीमध्ये ठेवण्यात येत होता.
आर्थिक गुन्ह्य़ांतील मुद्देमाल आता बँक ‘लॉकर’मध्ये
जप्त केलेला मुद्देमाल आता राष्ट्रीयीकृत बँकेच्या ‘लॉकर’मध्ये ठेवण्याचा निर्णय नागपूर पोलीस विभागाने घेतला आहे
Written by रोहित धामणस्कर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-10-2015 at 07:08 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money seized in monetary crimes will be kept in national banks lockers