इंडोनेशियाच्या एटीएमधून पैसे काढले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : उपराजधानीतील एका महिलेच्या बँक खात्यातून इंडोनेशियातील ऑनलाईन चोरटय़ांनी बाली येथील एटीएममधून ४१ हजार ३०० रुपये काढून फसवणूक केली. कार्ड हॅकिंगद्वारे ही फसवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

निर्मला वामनराव वहाने (५५) रा. रमाईनगर, नारी रोड असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते व दोन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना एक मुलगी असून ती युक्रेन देशात एमबीबीएस अभ्यासक्रमाला शिकत आहे. वहाने यांचे बँक खाते रेल्वेस्थानक मार्गावरील एसबीआयच्या मुख्य शाखेत आहे. मुलगी विदेशात शिकत असल्याने त्यांनी एसबीआयकडून ग्लोबल डेबिट कार्ड घेतले होते. ते कार्ड त्यांच्या मुलीकडे असते. १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून इंडोनेशियाची राजधानी बाली येथील एका एटीएममधून ४१ हजार ३०० रुपये काढण्यात आले. प्रथम वहाने यांना मुलीने पैसे काढले असावे, असे वाटले. मुलगी देशात परतली असता तिला विचारणा केली. तेव्हा मुलीने पैसे काढले नसून इंडोनेशियाला कधी जाण्याचा प्रसंग आला नाही. तसेच त्या दरम्यान मुलीने कार्डचा वापरच केला नाही. त्यावेळी त्यांनी बँकेत चौकशी केली असता कार्ड हॅकिंगद्वारे हे पैसे काढण्यात आले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.