Monkeypox treatment Nagpur : जगभरात ‘मंकीपाॅक्स’चा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार आता भारताच्या शेजारील पाकिस्तानपर्यंत पोहचला आहे. केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना करताच नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णशय्या आरक्षित केल्या गेल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही मेडिकल, मेयोला पत्र देत आवश्यक उपाय करण्याची विनंती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतासह महाराष्ट्रातही ‘मंकीपाॅक्स’चा गंभीर धोका बघता वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांची ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत ‘मंकीपाॅक्स’चा धोका सांगत केंद्र व राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली.

हेही वाचा – “व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष

बैठकीनंतर लगेच नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयाकडून तातडीने प्रत्येकी ५ रुग्णशय्येची सोय या आजाराच्या रुग्णांसाठी साथरोग विभागाच्या वार्डात केली गेली. बैठकीत वैद्यकीय सचिवांनी ‘मंकीपाॅक्स’चा संशयित रुग्ण आढळताच तातडीने त्याला रुग्णालयातील आरक्षित रुग्णशय्येवर विलगीकरणात ठेवण्याची सूचना केली. सोबत रुग्णांमध्ये लक्षणानुसारच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उपचार करण्याची सूचना केली. दोन्ही रुग्णालय प्रशासनाने बुधवारी स्वतंत्रपणे औषधशास्त्रासह इतर विभागाची बैठक घेऊन उपचाराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा करून उपचाराची पद्धत ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनेनंतर नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही तातडीने मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालय प्रसासनाला विनंती पत्र पाठवत दक्ष राहण्यासह आवश्यक उपाय करण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून तेथे संशयित रुग्णांची तपासणीसह इतर गोष्टींबाबत चर्चा केली. लवकरच महापालिकेच्या आरोग्य विभागाचीही बैठक होण्याचे संकेत आहे.

नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवणार

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या बैठकीत मंकीपाॅक्स संशयित रुग्ण आढळताच त्याचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. हे नमूने मेयोच्या एनायव्हीच्या उपकेंद्रामार्फत तपासणीला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – वर्ध्यात दारू पुरवठा करणाऱ्या नागपूरच्या बार मालकावर गुन्हा; २१ लाखांचा…

अधिकारी काय म्हणतात?

मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण म्हणाले, मेयो रुग्णालयात सध्या रुग्णांचा भार जास्त आहे. त्यानंतरही ‘मंकीपाॅक्स’साठी तातडीने पाच रुग्णशय्यांची सोय केली जाईल. येथील औषधशास्त्रासह संबंधित विभागाच्या डॉक्टरांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचनेनुसार उपचाराचीही दिशा ठरेल. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, मेडिकलमध्ये पाच रुग्णशय्या साथरोग विभागाच्या वार्डात आरक्षित केल्या गेल्या. येथे तज्ज्ञांच्या देखरेखीत अद्ययावत उपचाराची सोय करण्यात आली आहे.