नागपूर : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून अजूनही अपेक्षित प्रमाणात राज्यात सक्रिय झालेला नाही. काहीसा उशिराने का असेना पण केरळात दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या तळ कोकणातच अडकला. पण, बिपरजॉय चक्रिवादळामुळे त्याचा वेग मंदावला आणि मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा वाढतच राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांपासून मधूनच येणारी एखादी पावसाची सर आणि दिवसभरातील उन्हाचा तडाखा यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. परिणामी तापमानाचा पारा दोन ते तीन अंशांनी अधिक असल्याचे भासत आहे. मंगळवारी नागपुरात पारा ४१ अंशांवर पोहोचला होता. मुंबईतील तापमानाचा पारा ३३ अंश असूनही तो ३७ अंशांइतका जाणवत होता. दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटांसह पाऊस तर विदर्भातील तापमानाचा पारा वाढलेलाच असेल. तर काही भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू असेल.

हेही वाचा – फडणवीस यांची चतुर राजकीय खेळी

पुण्यात आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, काही भागांत पाऊस कोसळेल. चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली भागाची मात्र उन्हाळ्यापासून इतक्यात सुटका नाहीच.