नागपूर : अरबी समुद्रातील “बिपरजॉय” चक्रीवादळाने मॉन्सूनला गती दिली आहे. कर्नाटकच्या सीमेजवळ तो पोहोचला असून लवकरच तो गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : राज्यपाल रमेश बैस गजानन महाराज चरणी नतमस्तक; विविध उपक्रमांची घेतली माहिती
दहा जूनला मॉन्सूनने किनारपट्टी भागात वाटचाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा भाग व कर्नाटकचा किनारपट्टी भाग बंगालच्या उपसागराचा आणखी भागात मॉन्सूनला मजल मारली आहे. सध्या मॉन्सूनने केरळमध्ये हजेरी लावली असून तामिळनाडूचा भरपूर भाग व्यापला आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन बारा जुनपर्यत होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.