लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Yellow Alert in Vidarbha and Marathwada : मान्सूनला अनुकूल वातावरण राज्यात तयार झाले आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यात “यलो अलर्ट” देण्यात आला असून ठिकठिकाणी ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
वायव्य व पश्चिम, मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पाच सप्टेंबरनंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत आहे. रविवारी विदर्भातील वर्ध्यामध्ये ५१ तर नागपूरमध्ये ४५ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. तसेच, चंद्रपूर २७, ब्रह्मपुरी १०, गोंदिया ८ तसेच बुलढाणामध्येही ८ मिमी. पावसाची नोंद झाली.
आणखी वाचा-नागपूरमधील सातशे घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत
मराठवाड्यातील धाराशिवमध्ये २६ मिमी., नांदेड १८ तसेच परभणीमध्ये ०.१ मिमी. इतका पाऊस नोंदवला गेला. मध्य महाराष्ट्रातही महाबळेश्वरमध्ये ८ मिमी., सोलापूर ३ तर कोल्हापूरमध्ये ०.१ मिमी. पाऊस पडला. कोकण भागातील मुंबईमध्ये ०.४ तर डहाणूमध्ये ०.४ मिमी. पाऊस पडला.
दरम्यान, राज्यात “यलो अलर्ट” देण्यात आला असून मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, उर्वरित भागात पावसाची शक्यता आहे.