नागपूर : उन्हाळ्याने अखेर अधिकृतरित्या निरोप घेतला, ज्यामुळे वैदर्भियांना आता मोसमी वाऱ्याची प्रतिक्षा आहे. विदर्भात तसेही मे महिन्याच्या अखेरीस उन्हाळा जाणवला, पण त्याआधी सातत्याने अवकाळी पाऊसच होता. आता मोसमी वाऱ्याची वाटचाल सुरू झाली असून राज्यात आणि त्यानंतर विदर्भातही तो लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीत कोणतेही अडथळे आले नाही आणि त्याची वाटचाल अशीच सुरू राहीली तर विदर्भात मोसमी पाऊस निर्धारित तारखेपूर्वीच दाखल होऊ शकतो, असे संकेत प्रादेशिक हवामान खात्याने दिले आहे. या संकेतामुळे शेतकरी सुखावला असला तरी कुठेतरी धाकधूक कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतात मोसमी पावसाचा प्रवेश केरळमार्गे होतो आणि यावेळी निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच म्हणजे ३० मे रोजी मोसमी पावसाने केरळमध्ये धडक दिली. मोसमी पावसाने दक्षिण कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूही व्यापला आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे तळकोकणातही तो दाखल होईल. याच पद्धतीने म्हणजेच वेगाने मोसमी पाऊस वाटचाल करत राहीला तर महाराष्ट्र आणि विदर्भातही मोसमी पावसाचे लवकरच आगमन होण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात साधारणपणे १५ जूनच्या आसपास मोसमी पाऊस दाखल होतो. मात्र, यावेळी केरळमध्ये तो दोन दिवस आधीच दाखल झाल्यामुळे विदर्भातही तो लवकर येऊ शकतो. मात्र त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या आर्द्रता वाढू लागल्याने या आठवड्यात विदर्भात काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसांच्या सरींचीही शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपूर शहरात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने प्रवेश केला.

हेही वाचा…चंद्रपूर: ‘निर्भय बनो’, ‘संविधान’चा फायदा काँग्रेसला; ओबीसी, दलित, मुस्लीम समाजाची गठ्ठा मते धानोरकरांना

दरम्यान, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा संपूर्ण भारतात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्यातर्फे नुकताच दुसरा व अंतिम अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार, यावर्षीच्या मोसमी पावसावर ‘ला निना’चा अनुकूल प्रभाव असल्यामुळे काही राज्यांमध्ये तब्बल १०६ टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. विदर्भातही दमदार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा…धानोरकर कुटुंबीयांची परंपरा; केंद्र व राज्याच्या मंत्र्यांना करतात पराभूत

अवकाळी पावसाने विदर्भात आधीच धुमाकूळ घातला होता. पावसाळ्यात पडणार नाही इतका पाऊस त्यावेळी पडला. वादळीवारे, गारपीट असे मुसळधार पावसाचे रुप वैदर्भियांनी पाहीले. त्यामुळे आता प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि यात मोसमी पाऊस कसा राहणार याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.