सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासंबंधीचे धोरण आतापर्यंत कोणत्याच सरकारने आखले नव्हते. प्रथमच केंद्रातील मोदी सरकारने या क्षेत्राचा विचार करून कोटय़वधी लोकांना रोजगार पुरवला, असा दवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्र शासनातील अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, सर्वाधिक रोजगार लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमधून निर्माण होतो. मात्र, यासंदर्भात कोणत्याच सरकारने यापूर्वी लक्ष दिले नाही. उलट केवळ मोठय़ा उद्योगांविषयी धोरणे आखण्यात आली. त्या उलट मोदींनी केवळ मुद्रा कर्ज योजनेतून १ कोटी ९ लाख लोकांना ६० हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले.

गडकरी म्हणाले, सर्वाजिक रोजगार ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रिजमधून’ उपलब्ध होतो. आपल्याकडे ऊर्जा कमतरता नाही. भारत निर्यातीमध्येही आता सक्षम होत आहे. २० टक्के आयात आणि आठ टक्के निर्यात आपल्याकडे आहे. ही दरी भरून निघायला हवी. त्यासाठी छोटय़ा उद्योगांना प्रोत्साहनाची गरज आहे.

मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

भारताला आर्थिक महासत्ता करण्याची  ताकद लघु उद्योगांमध्ये आहे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी  केंद्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘पीएसबी लोनइन ५९ मिनिट’ या ऑनलाईन पोर्टलची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनात करण्यात आली. तेथील त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण येथील कार्यक्रमात करण्यात आले.  अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी एमएसएमई फार मोठी भूमिका बजावू शकते. अनेक शहरांची ओळखच लघु शहरांमुळे होते.असे मोदी म्हणाले. केंद्राने. ८० जिल्ह्य़ांमध्ये या पोर्टलचे लोकर्पण झाले. महाराष्ट्रातील सांगली आणि नागपूरचा त्यात समावेश आहे.

 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More employment generation in small scale industries says chief minister