नागपूर : राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या शंभरहून अधिक संस्थांनी स्वच्छ हवेसाठी एकत्रित येऊन आभासी मानवी साखळी (व्हर्च्युअल ह्यूमन चेन) तयार केली आहे. सात सप्टेंबर या ‘इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज’च्या निमित्ताने या संस्था, जागरुक नागरिक एकवटले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्वसनासाठी स्वच्छ हवा मिळावी यासाठी जागरुक असलेल्या नागरिकांनी या उपक्रमामध्ये एका खास वेबसाईटवर आपले सेल्फी अपलोड केले आहेत. या व्हर्च्युअल ह्यूमन चेनला कलाकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या भारतीय सदिच्छा दूत दिया मिर्झा, पुण्याच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हान, निवृत्त न्यायमूर्ती अंजना प्रकाश अशा दिग्गजांनी पाठिंबा दर्शविला आहे.

हेही वाचा – जन्माष्टमी विशेष : रुक्मिणी हरणाशी आहे अमरावतीच्या ‘या’ मंदिराचा संबंध; काय आहे आख्यायिका, जाणून घ्या…

टुगेदर फॉर क्लीन एअर हा हॅशटॅग वापरून आठशेहून अधिक नागरिकांच्या सहभागाने ही आभासी मानवी साखळी आकारास आली आहे. क्लीन एअर कलेक्टिव्हच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले आहे. हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी हवा प्रदूषणाबाबत जागरुक अशा देशभरातील नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे.

हेही वाचा – गोंदिया : पावसाळा शेवटच्या टप्प्यात, पण तलावांच्या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रितेच! केवळ पाच प्रकल्प पूर्ण भरले

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि देशातील इतर शहरांतील अनेक संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. टुगेदर फॉर क्लीन एअर या हॅशटॅग अंतर्गत सुरू असलेल्या या अभियानात चर्चासत्रे, जनजागृती कार्यक्रम, क्लीन एअर वॉक यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. नागपूर असो की पुणे राज्याच्या प्रत्येक भागांत हवा प्रदूषण समस्येला तोंड द्यावे लागते हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही आभासी मानवी साखळी निर्माण करण्यात येत आहे.