माणूस प्रेमात पडला की ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. मग ते प्रेम माणसाचे माणसासाठी असो, वा माणसाचे प्राण्यासाठी. चीन हे भारताचे शत्रुराष्ट्र, पण हेच राष्ट्र भारतीय ‘पँगोलीन’च्या प्रेमात पडले. त्याला मिळवण्यासाठी त्यांनी जीवंतच नाही तर शिकार करुन त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार वर्षात १२००हून अधिक ‘पँगोलीन’ त्यांनी या ना त्या पद्धतीने आपल्या ताब्यात घेतले.

हेही वाचा- सावधान! नागपूरमध्ये अद्याप लहान मुलांमध्येच गोवरचे संक्रमण; प्रौढांनी…

minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी शासनाने नियम कितीही कडक केले आणि कठोर कारवाईचा बडगा उभारला तरीही ही तस्करी मात्र थांबलेली नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत अनुसूची एकमध्ये असणारा ‘पँगोलीन’ हा प्राणीही त्यातून सुटला नाही. महाराष्ट्र हा या प्राण्यांच्या तस्करीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅफिक इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया या दोन्ही संस्थांनी नुकत्याच या प्राण्यांच्या तस्करीचा जाहीर केलेला अहवाल तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. गेल्या चार वर्षातील आतापर्यंतची ‘पँगोलीन’ची सर्वाधिक जप्ती ओडिशातून करण्यात आली असून त्यापाठोपाठ ती महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. ३४२ जप्तीच्या घटनांमध्ये वन्यजीव व्यापारासाठी १२०३ ‘पँगोलीन’ची शिकार व तस्करी झाली आहे. त्यापैकी ओडिशातील ७४ जप्तीच्या घटनांमध्ये १५४ तर महाराष्ट्रातील ४७ जप्तीच्या घटनांमध्ये १३५ ‘पँगोलीन’चा समावेश आहे. यातील ५० टक्के घटनांमध्ये जिवंत खवले मांजरांचा समावेश आहे. ‘पँगोलीन’च्या खवल्यांचा वापर चिनी औषधांमध्ये केला जातो. त्यापासून पारंपरिक औषध तयार केले जाते.