लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला. मात्र नागपूर जिल्ह्यात अशाच प्रकारे दोन वर्षात घडलेल्या दोन दुर्घटना मध्ये तब्बल १७ कामगारांचा मृत्यू झाला. नागपूरजवळील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोझिव्ह आणि धामनातील चामुंडी कंपनीत मागील दोन वर्षांत वेगवेगळ्या स्फोटात १७ हून अधिक कामगारांचे बळी गेले आहे.

दारूगोळा निर्मिती करणाऱ्या काही सरकारी व खासगी आयुध निर्माणी विदर्भात आहेत. येथे लष्करी वापरासाठी बॉम्ब, अग्निबाण, बॉम्बचे कवच आणि अन्य शस्त्रे तयार होतात. वर्ष २०१६ दरम्यान पुलगावातील शस्त्रभांडाराला भीषण आग लागून १७ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर या घटनेत अनेक जण गंभीररित्या भाजले गेले होते. दीड वर्षांपूर्वी नागपूरजवळील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीमध्ये स्फोट होऊन ९ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

दरम्यान सात ते आठ महिन्यापूर्वीही धामनातील चामुंडी कंपनीतीही स्फोट होऊन एकूण नऊ कामगारांचा बळी गेला होता. त्यामुळे विदर्भात सातत्याने दारुगोळा कंपनीत स्फोट होऊन बळी वाढतांना दिसत आहे. सातत्याने वाढणाऱ्या घटनांमुळे येथील दारुगोळा कंपनीत कामगारांसह इतरांच्या सुरक्षेच्या उपायांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भंडारातील आयुध निर्माणी कंपनीतील स्फोटामुळे पून्हा या सगळ्याच घटनांना उजाळा मिळाला आहे.

भंडारातील घटना काय?

भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. त्यात बऱ्याच कामगारांसह इतरही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे शोधण्याचे काम विविध तपास यंत्रणेद्वारे सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार येथून काढलेल्या पाज जणांना रुग्णालयात हलवले गेले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे तुर्तास पुढे येत आहे. तर तीन मृतदेहही काढले गेले आहे. सध्या येथे आणखी सात ते आठ जण फसले असल्याची माहिती आहे. परंतु बचाव कार्य पूर्ण झाल्यावरच मृत्यू व जखमींची नेमकी आकडेवारी स्पष्ट होणार आहे.

पुलगावची घटना काय होती?

देशातील सर्वांत मोठे लष्करी शस्त्रसाठ्याचे ठिकाण असलेल्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) मे २०१६ मध्ये भीषण आग लागली. या आगीनंतर झालेल्या स्फोटात लष्करच्या दोन अधिका-यांसह १७ जणाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी होते. त्यामुळे काही दिवसांनी मृत्यूचा आकडाही वाढला होता.