लोकसत्ता टीम

यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील गंगनमाळ येथे अतिसाराची साथ पसरली आहे. गावात २०० च्या वर रुग्ण आढळले आहेत. यातील अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रवाना करण्यात आले.

Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार

चार दिवसांपूर्वी गंगनमाळ येथे अख्खे गाव, पोटदुखी, पाय दुखणे, बारीक ताप व मळमळीच्या प्रकोपाने ग्रासले होते. मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावात दाखल होऊन रुग्णांवर उपचार केले. जनूना गट ग्रामपंचायतच्या गलथानपणाचा फटका गंगनमाळच्या नागरिकांना बसला आहे. पाण्याची टाकी साफ करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, याकडे लक्ष न दिल्यामुळे गाव आजारी पडल्याचे सांगितले जाते. शाळेत जिल्हा परिषद आयसोलेशन कॅम्प सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा… बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक; अकोल्यात २५ मागण्यांच्या निवेदनाची होळी, रास्ता रोको

रविवारी आरोग्य पथकाने १४ रुग्णांना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. तर तीन नवीन रुग्ण आढळले. त्यांच्यावर गावातच उपचार सुरू आहेत. सहा दिवस आरोग्य पथकाचा कॅम्प सुरू राहणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पाऊस सुरू होण्यापूर्वीच साथ रोगांचा उद्रेक सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्धव हिंगमिरे, समुदाय आरोग्य अधिकारी भगवान ढाले, आरोग्य सहायक विनोद घुगे, आरोग्य सहायक शकुंतला लोने, सुहास दरुर, गट प्रवर्तक रिना कोंढुरकर व आशा स्वयंसेविका गावात लक्ष ठेवून आहेत. आवश्यकता पडल्यास शिबिराचा कालावधी वाढवण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.