नागपूर: बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी(बीएनएचएस) फेब्रुवारी २०२१ पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या सहकार्याने दर महिन्याला पक्षी गणना आयोजित करते. यात ५०पेक्षा अधिक बीएनएचएसचे सदस्य आणि स्वयंसेवक सहभागी होतात. उद्यान आणि अभयारण्य अशा दोन्हीमध्ये महत्त्वाच्या १२ ठिकाणांवर ती आयोजित करण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणाऱ्या रविवारी या संपूर्ण पक्षीगणनेचे नियोजन वनविभागासोबत मिळून सहाय्यक संचालक डॉ. राजू कसंबे व कार्यक्रम अधिकारी आसिफ खान करतात. यावेळी २९ ऑक्टोबरला ही पक्षीगणना आयोजित करण्यात आली. यात ५० पेक्षा अधिक अभ्यासक व स्वयंसेवक आणि वनखात्याचे अधिकारी सहभागी होते. या गणनेत १०१ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. यात तीन नवीन प्रजातींचा समावेश करण्यात आला. त्यात भारतीय निलपंख, आखूड बोटांचा चंडोल आणि धूतर ससाणा यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे २०२१ पासून तर आतापर्यंत २१९ प्रजाती नोंदवण्यात आल्या. अशा गणनेच्या आयोजनामुळे पक्षांच्या संशोधन आणि सवर्धनासाठी मोलाचा हातभार लाभतो.

हेही वाचा… महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून दंतचे महागडे उपचार दूर; राज्यातील गरीब रुग्णांचा वाली कोण?

हेही वाचा…. Maharashtra News Live : मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात, शरद पवारही उपस्थित

ही गणना दर महिन्याला आयोजित करण्यात येते आणि त्याबाबतची माहिती वेळोवेळी बीएनएचएसच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते. या उपक्रमात अधिकाधिक पक्षी अभ्यासकांनी सहभागी होण्याचे आवाहन बीएनएचएसने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 219 bird species in sanjay gandhi national park nagpur rgc 76 dvr