भंडारा : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून कार्यकर्ते आणण्यात आले. मात्र भंडारा येथील बचत गटाच्या शेकडो महिलांना फिरायला जायचे असे सांगून त्यांना अंधारात ठेवून छञपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. या महिलांना बचत गटातर्फे फिरायला आणले नसून बच्चू कडू यांच्या मोर्चासाठी नेण्यात आल्याचे लक्षात येताच महिलांनी भंडारा येथील प्रहारचे अध्यक्ष अंकुश वंजारी आणि पदाधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॉल बंद करून ठेवला असल्याने या सर्व महिला तेथे अडकून पडल्या आहेत. या महिलांना वाऱ्यावर सोडून पदाधिकारी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना या महिलांनी त्यांना जिल्ह्यात परत आणण्यासाठी विनंती केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा