बुलढाणा : अंतिम टप्प्यापर्यंत अत्यंत चुरशीची लढत ठरलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या लढतीत तब्बल पावणेसात लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी व तितकेच गंभीर चित्र आहे. थेट निवडणूक आयोग ते जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न, प्रचाराचा गाजावाजा, मोठ्या संख्येतील उमेदवार, याउप्परही तब्बल ३८ टक्के मतदारांनी मतदान न करणे, हा चिंता व चिंतनाचा विषय ठरावा.

यंदा आयोगाच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने दीडेक महिन्यापासून सतत विविध उपक्रम राबविले. यातून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात मतदान जागृती करण्यात आली. यात स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनीही हातभार लावला. यामुळे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी यंदा ७० टक्के मतदानाची शक्यता वर्तविली होती. निवडणूक रिंगणात तब्बल २१ उमेदवार होते. महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी झंझावती प्रचार करून मोठ्या संख्येने प्रचारसभा लावल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यासह अपक्ष रविकांत तुपकर, संदीप शेळके या उमेदवारांनीही ‘रोड शो’, प्रचारफेऱ्या काढून वातावरण निर्मिती केली. वंचित, बसपा यांसह इतर अपक्षांनी आपापल्या परीने प्रचार केला. मतदारसंघात हजारो प्रचाररथ, ध्वनिवर्धक, फलक, याद्वारे प्रचार करण्यात आला. समाजमाध्यमे तर निवडणुकांनी व्यापून गेल्याचे दिसून आले.

yavatmal political parties campaigning
यवतमाळ: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
union minister nitin gadkari interview for loksatta ahead of Maharashtra Assembly Election 2024
व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!

हेही वाचा…मतदान न करताच ५०० रुपये देऊन बोटाला शाई लावली, भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला पळवले…महाविकास आघाडीचा उमेदवार संतापला….

सामूहिक रोष?

रिंगणात युती, आघाडी, दोन तगडे अपक्ष, वंचित, असे पर्याय होते. अपक्षांची भरमार होती. खासदारांविरुद्ध काहीसा रोष असला तरी मतदारांना अन्य पर्यायही होते. याउप्परही सगळ्यांना नापसंत करून रोष व्यक्त करायचा तर ‘नोटा’च्या रुपाने बाविसावा पर्याय देखील होता. असे असतानाही ६ लाख ७६ हजार ९३९ मतदारांनी पवित्र हक्क बजावण्याचे टाळणे, ही धक्कादायक बाबच ठरावी.

हेही वाचा…मतदान न करणाऱ्यांविरोधात नागपुरात संताप…..

विधानसभानिहाय नाकर्ते मतदार

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात २९३४४९ पैकी १,३५ ११८ मतदारांनी मतदान करण्याचे टाळले. सुशिक्षित, नोकरदार वर्गाचा, जिल्हा मुख्यालय केंद्रबिंदू असलेला हा मतदारसंघ आहे. याशिवाय, चिखली ११०१८९, सिंदखेडराजा १२१४३०, मेहकर १०५१५५, जळगाव १०७२२७ आणि खामगावातील ९७८२० मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.