नागपूर: “काँग्रेसकडून संपर्क झालेला नाही. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत असून विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे,” असे मत मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र भुयार म्हणाले, “संजय राऊत यांनी अपक्षांवर आरोप केल्याने गैरसमज झाला होता. त्यामुळे सर्व अपक्ष नाराज होते. अजूनही त्यांचा आमच्यावर अविश्वास असेल, तर इलाज नाही. संजय राऊत यांनी माझ्या पक्षाला मतदान करु नको, असे सांगितले तरी मी महाविकास आघाडीला मतदान करणार आहे. हे राज्यसभेच्या वेळी सांगितले होते, आताही तेच कारणार आहे.”
हेही वाचा : “माझं २०१४ पासून थकलेलं बिल द्या”; सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवत मागणी करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल
“भाजपने मला संपर्क केला नाही. मी अजित पवार यांच्यासोबत आहे याची त्यांना कल्पना आहे. इतर अपक्षही आघाडीच्या संपर्कात आहेत. मी आताही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला आहे, पण अजूनही दिलेला नाही,” असंही आमदार भुयार यांनी नमूद केलं.