महेश बोकडे

बँकांविरोधात ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. गेल्या वर्षभरात देशातील विविध बँकांविरोधात नागरिकांनी भारतीय रिझर्व बँकेकडे १.९० लाखाच्या जवळपास तक्रारी केल्या. सर्वाधिक तक्रारी भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँकेविरोधात असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Kuwait Bank Fraud: Kerala Nurses Under Scrutiny
Kerala Nurses Fraud : १४०० नर्सेस, ७०० कोटी आणि गल्फ बँक… कुवेतमधील अर्थिक घोटाळ्याचे काय आहे केरळ कनेक्शन?

बँकेत धनादेश टाकल्यावर तो न वटणे, नियमानुसार खातेधारकाला व्याज न मिळणे, एटीएममधून व्यवहार केला नसताना झालेली कपात, खात्यातील कपातीसह बँकांशी संबंधित तक्रारी प्रथम बँकेच्या व्यवस्थापकाकडे केल्या जातात. बँकेच्या शाखेत न्याय न मिळाल्यास ही तक्रार बँकेच्या मुख्य शाखेकडे केली जाते. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास भारतीय रिझर्व बँकेच्या लोकपालाकडे दाद मागता येते. आरबीआयच्या लोकपालाकडे देशभऱ्यातील विविध बँकांच्या विरोधात १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान १ लाख ८९ हजार ४८८ तक्रारी केल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे. या तक्रारीवर भारतीय रिझर्व बँकेकडून संबंधित बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तक्रारीवर काय कारवाई केली, हे बँकेला आरबीआरला कळवावे लागते.

सहकारी बँकांविरोधातही तक्रारी
ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात आरबीआयकडे २६६ तक्रारी, सारस्वत को- ऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात २३७, महाराष्ट्रा ग्रामीण बँक ११२, कॉसमॉस को- ऑपरेटिव्ह बँक ८२, अभूदय को- ऑफरेटिव्ह बँक लिमिटेड ७८, बॉम्बे र्मकटाइल को-ऑप. बँक लिमी. ५६, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमी. ५५, ठाणे जनता सहकाही बँक लिमी. ४२, नगर अर्बन को- ऑप. बँक लिमी. २७, डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमी. २७, शंकरराव पुजारी नूतन नगरी सहकारी बँक लि. इचलकरंजी २०, यवतमाळ अर्बन को- ऑप. लिमी. २०, मलकापूर अर्बन को- ऑप. लिमी. १८, नागपूर नागरिक सहकारी बँक लिमी. १६, अकोला अर्बन को- ऑप. लिमी. १५, द महानगर को- ऑप. बँक लिमी. मुंबई १२, जनता को- ऑप. लिमी. मालेगाव १२, मलकापूर अर्बन को- ऑप. लिमी. १२, जनता सहकारी बँक लिमी. १२, द अकोला जनता कमर्शियल को- ऑप. बँक लिमी. ११, शिक्षक सहकारी बँक लिमी. ८ तक्रारी आणि इतरही बऱ्याच बँकांच्या विरोधात कमी- अधिक तक्रारी आल्या आहेत.

Story img Loader