महेश बोकडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे. २३ जुलै २०२३ पर्यंत या महामार्गावर ६० प्राणांतिक अपघात होऊन १२३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक ५३ मृत्यू हे केवळ बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या अपघातातील आहेत.
या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी.चा दुसऱ्या टप्प्याची वाहतूक मे २०२३ पासून सुरू झाली. वाहतूक सुरू झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. पहिल्या दिवसापासून २३ जुलै २०२३ पर्यंत या महामार्गावर ६० प्राणांतिक अपघातात १२३ मृत्यू झाले. एकूण अपघातांमध्ये दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातांची संख्या २७ तर एकाच वाहनाच्या अपघातांची संख्या ३३ आहे. दरम्यान, परिवहन खात्याच्या निरीक्षणात सकाळी ६ ते सायंकाळी ६ दरम्यानच्या काळात २८ आणि संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत या महामार्गावर ३३ अपघात नोंदवले गेले आहेत.
अपघातांची स्थिती
जिल्हा अपघात मृत्यू
नागपूर ०० ००
वर्धा ०६ ०९
अमरावती ०८ १०
वाशीम ०७ ०९
बुलढाणा १७ ५३
जालना ०७ ०९
औरंगाबाद १० १८
श्रीरामपूर ०३ ०८
नाशिक ०२ ०७
एकूण ६० १२३
प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने समृद्धी महामार्गावर सातत्याने निरीक्षण केले जात आहे. तपासणीही वाढवण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने या महिन्यात अपघात कमी झाले. बुलढाणा जिल्ह्यात जास्त अपघात असल्याने तेथे विशेष लक्ष दिले जात आहे. – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.
‘समृध्दी महामार्गाच्या कामात घाई नाही’
नाशिक : समृध्दी महामार्गाचे काम निश्चित वेळापत्रकानुसार होत आहे. महामार्गाचा सिन्नरपुढील टप्पा सप्टेंबर किंवा ऑक्टोबपर्यंत कार्यान्वित होईल. मे २०२४ पर्यंत वडपेपर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाच्या कामात घाई गडबडीचा विषयच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दादा भुसे यांनी दिले.
महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी येथे आलेले नाशिकचे पालकमंत्री भुसे यांनी शहापूर तालुक्यात समृध्दी महामार्गावरील क्रेन अपघातानंतर सुरू असलेल्या वेगवेगळय़ा चर्चावर भाष्य केले. समृध्दी महामार्गाच्या कामात सिंगापूरची यंत्रणा वापरली जात आहे. या भागातील पुलावर ११५ ते १२० कॉलम आहेत. त्यापैकी ९४ कॉलमचे काम या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण झाले होते. केवळ १६ कॉलमचे काम बाकी असताना ही घटना घडली.
उच्च तंत्रज्ञान व मोठी क्षमता असलेले काम संबंधित कंपनी करीत आहे. दिवसा व रात्री काय काम करायचे याचे नियोजन त्यांच्यामार्फत केले जाते. या यंत्रणेच्या वापरातून आजवरचे काम झाल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले. हा अपघात कशामुळे झाला, याचा निश्चितपणे शोध घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.