राखी चव्हाण

‘द हार्ट ऑफ कंट्री’… देशाच्या मध्यस्थानी असणारी राज्याची उपराजधानी.. म्हणजेच नागपुरात खवय्याची संख्या काही कमी नाही. इथली खाद्य संस्कृती आणि खवय्यांची खवय्येगिरी म्हणजे काही बोलायलाच नको. तिखटासोबत आणि गोडासोबत खाता येणारे ‘परफेक्ट’ खाद्य म्हणजे मडक्यावर बनणारी ‘लंबी रोटी’. जी ‘मटका रोटी’ या नावानेही ओळखली जाते. चिकन, मटणचा झणझणीत सावजीचा रस्सा असो, वा आंब्याचा रस, बासुंदी.. त्याच्यासोबत हमखास खाल्ली जाते ती नागपूरातील प्रसिद्ध लंबी रोटी.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…

हेही वाचा >>> नागपूर : मुदत संपली तरी मतदार नोंदणीचा पर्याय, शिक्षक मतदारसंघ निवडणूक

या ‘मटका रोटी’ म्हणजेच माठावर तयार होणाऱ्या ‘लंबी रोटी’ने उपराजधानीच्या ओळखीत भर घातली आहे. येथील खाद्य संस्कृतीची ती एक ओळख बनली आहे. त्यामुळे स्थानिक खवैय्यांसोबतच बाहेरुन येणारा पाहूणाही अगदी आवडीने त्यावर ताव मारतो. ही ‘रोटी’ गरमगरम खाण्यातच अधिक मजा आहे. सुरुवातीला रामेश्वरी, शताब्दी चौक, इंदोरा या परिसरातच मिळणारी ‘लंबी रोटी’ आता बजाजनगर, त्रिमूर्तीनगर आदी शहराच्या कानाकोपऱ्यात मिळायला लागली आहे. खाद्य संस्कृतीवर हल्ली पुरुषांची मक्तेदारी वाढत चालली असली तरीही ‘लंबी रोटी’ वर महिलांचाच वरचष्मा आहे. पुरुषही या व्यवसायात आहेत, पण स्त्रीया ज्या सराईतपणे ती तयार करतात, त्याची सर पुरुषांनी तयार केलेल्या ‘लंबी रोटी’ला नाहीच. त्यामुळे कोणत्या मोठ्या कार्यक्रमातही ती असेल तर स्त्रीयाच त्या बनवताना दिसून येतात. कारण ते अतिशय जिकरीचे, संयमाचे, मेहनतीचे आणि कौशल्याचे काम आहे. यातून तयार होणारी ‘लंबी रोटी’ पोटात गेली की खवय्ये तृप्त झालेच म्हणून समजा.

Story img Loader