चंद्रपूर: नागपूर-नागभीड मार्गावर धावणाऱ्या रेतीच्या टिप्परणे दिलेल्या धडकेत आई कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) व मुलगा रमाकांत कड्यालवार (३०) याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. नागभीड तालुक्यातील व तळोधी (बा.) जवळील बोकोडोड नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात वडील रमाकांत पांडुरंग कड्यालवार (६२) हे गंभीर जख्मी झाले. सिंदेवाही-लोनवाही येथील त्रिवेणी नगरात राहणारे रमाकांत कड्यालवार यांच्या गाडीला बोकोडोह नदीवर विचित्र अपघात झाला.
मुलाला बुलेट घेऊन दिल्यानंतर दुचाकीने मुलगा साहील गावाकडे येत असताना त्यांच्या मागे वडील कारने येत होते. अचानक बोकोडोह पुलावर मुलाची बुलेट बंद पडल्यामुळे तिच्या मागे आपली गाडी थांबवून असता मागून येणाऱ्या टीप्पर वाहनाने जोरदार धडक दिल्याने चारचाकीची बुलेटवर बसून असलेला मुलगा साहील रमाकांत कड्यालवार (३०) व कल्पना रमाकांत कड्यालवार (५२) यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. ते पुलावरून खाली पडल्याने मुलगा व आईचे या विचित्र अपघातात निधन झाले. वडील गंभीर जखमी झाले.