नागपूर : मेळघाटातील आदिवासींसाठी वनखात्याकडून गेल्या अनेक वर्षांनंतर वनरक्षकपदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इतक्या वर्षानंतर होणाऱ्या भरतीप्रक्रियेत आदिवासी तरुणाई कुठेही कमी पडू नये म्हणून या व्याघ्रप्रकल्प प्रशासनासोबतच दिशा फाउंडेशनने पुढाकार घेतला. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली आणि काय आश्चर्य, या कार्यशाळेत एक विवाहीत युवती आपल्या चिमुकल्याला घेऊन सहभागी झाली. या भरतीप्रक्रियेत आपली सून मागे पडू नये म्हणून मग सासूही तिच्या मदतीला धावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरतीप्रक्रियेसाठी आधी परिक्षेला सामोरे जावे लागणार आहे आणि त्यात आदिवासी तरुणाई कुठेही मागे पडू नये म्हणूनच ही कार्यशाळा आयोजित केली होती. परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून मेळघाटातील गौरी जावरकर या युवतीने आपल्या बाळासह या कार्यशाळेला हजेरी लावली. बाळाची दिवसभर आबाळ होऊ नये म्हणून दिवसभर तिच्या सासूने संकुल परिसरात बाळाची देखभाल केली.

हेही वाचा – २५ प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली ‘ती’ बस पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे

मेळघाटातील आदिवासी तरुणाईला परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाने पहिले पाऊल उचलले आहे. अमरावती येथील दिशा फाउंडेशनने त्यांना सहकार्याचा हात समोर केला आहे. या तरुणाईसाठी आयोजित पहिल्याच मार्गदर्शन कार्यशाळेत तब्बल सहाशेहून अधिक बेरोजगार युवकयुवती सहभागी झाले. विशेष म्हणजे यात जवळजवळ २५० ते ३०० युवतींचा समावेश होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law rushed to help daughter in law for preperation of forest guards recruitment melghat rgc 76 ssb
Show comments