नागपूर: पत्नीशी वाद झाल्यानंतर सासूने भांडणात उडी घेतली. चिडलेल्या जावायाने सासूला मारण्याची धमकी देऊन भांडण केले. त्यामुळे चिडलेल्या सासूने तीन नातेवाईक युवकांकडून जावायावर चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. विजय सोंमकुवर (३७) रा. सुभाषनगर असे जखमी नाव आहे. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय विवाहित असून पत्नीसह मागील दहा वर्षापासून सासू बेबी वानखेडे यांचे घरी राहतो. विजय आणि त्याची पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. एकाच घरी राहात असल्याने सासूने मध्यस्थी केली. काही वेळातच वाद शांत झाला. नंतर सासू ही फिर्यादीची साळी करूणा मासूरकर हिच्या घरी गेली. सायंकाळच्या सुमारास फिर्यादी विजय घरी असताना सासूचे नातेवाईक आरोपी प्यारेलाल नाहरकर (३४), रोहण नाहरकर (३०) दोन्ही रा. सिम टाकळी आणि अंकीत चिमोटे (३०) रा. गायत्रीनगर हे तिघेही विजयच्या घरासमोर आले.

हेही वाचा… रानडुक्कर आडवे आले अन गस्तीवरील पोलीस वाहन…

सासू सोबत झालेल्या भांडणावरून त्याला शिवीगाळ केली. त्याला घराबाहेर बोलाविले. हातबुक्कीने मारहाण करून छाती आणि हातावर शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आणि पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत विजयला मेडीकल रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law tried to kill soninlaw by attacking him with a knife in nagpur adk 83 dvr