नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते…असे म्हटल्या जाते. तीन मुलांची आई असलेली महिला एका युवकाच्या प्रेमात पडली. तिने प्रेमासाठी पती व एका मुलाचा त्याग केला आणि प्रियकराच्या घरी राहायला आली. दोन महिन्यांतच प्रियकराने घर सोडून पलायन केले. त्यामुळे एकाकी पडलेल्या महिलेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. चेतन बावनकर (४०) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित २६ वर्षीय विवाहित महिला संजना (बदललेले नाव) वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत राहते. तिला तीन मुले असून पतीला दारुचे व्यसन आहे. तो बेरोजगार असून मिळेल तेव्हाच काम करतो. घरात आर्थिक चणचण असल्यामुळे संजनाने स्वतः घराबाहेर पडण्याचे ठरवले. ती गेल्या काही महिन्यांपासून एका कपड्याच्या मोठ्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करते. तिची बहिण वाठोड्यातील एका वस्तीत राहते. तिच्या घरी पाहुणी म्हणून उन्हाळ्यात ती आली होती. त्यावेळी बहिणीच्या नात्यातील युवक चेतन बावणकर याच्याशी ओळख झाली. चेतनचे लग्न झाले होते. परंतु, काही महिन्यांतच पत्नीने त्याच्याकडून घटस्फोट घेतला होता. तर त्याच्या आईवडिलाचे कोरोनामध्ये निधन झाले. तो दोन माळ्याच्या इमारतीत एकटाच राहत होता. तो एका स्विमिंग क्लासेसवर प्रशिक्षक म्हणून कामाला होता. दोघांची ओळख झाल्यानंतर एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले. त्यानंतर दोघेही संपर्कात राहायला लागले. यादरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. संजना वारंवार चेतनला भेटायला घरी यायला लागली. दोघांचे एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. तेव्हापासून संजनाचे स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाले.

हे ही वाचा…Maharashtra Election 2024 : तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’?

पतीला सोडल्यानंतर लग्न

चेतन आणि संजनाच्या अनैतिक संबंधाची नातेवाईकांध्ये चर्चा होती. त्यामुळे संजनाने त्याच्यापासून दुरावा ठेवण्याचे ठरविले. मात्र, चेतनने तिला दिवाळीत लग्न करु, असे आमिष दाखवले. त्यासाठी पतीला सोडण्याची अट ठेवली. तिने भविष्याचा विचार करता एका मुलाला पतीकडे सोडले आणि दोन मुलांना घेऊन थेट प्रियकर चेतनच्या घरी राहायला आली. ऑगस्ट महिन्यापासून दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. दोघांचेही संबंध सुरळीत होते.

हे ही वाचा…आचारसंहिता : नागपुरात मुख्यमंत्र्यांचे फलक काढले

प्रियकराने काढला पळ

काही दिवसांपूर्वी संजनाने लग्नाचा तगादा लावल्याने चेतन त्रस्त झाला. समाजात बदनामी होऊ नये म्हणून मंदिरात जाऊन लग्न करण्याचा पर्याय संजनाने सूचवला. मात्र, चेतनने लग्नासाठी चक्क नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेतनने घरातून पलायन केले. त्यामुळे संजनाच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने लगेच वाठोडा पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार हरिषकुमार बोराडे यांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी संजनाच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी चेतनचा शोध सुरु आहे.

4o mini

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother of three childeren left home for lover and he ran away after two months adk 83 sud 02