लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुलढाणा : बिहारची राजधानी पाटण्यात जमलेले विरोधी पक्षाचे नेतेच भाजपा व नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकतात, हा त्यांचा गैरसमज आहे. या बैठकीला एआयएमआयएमच काय बसपा नेत्या मायावती, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले नाही. हे अनाकलनीय आहे, अशी टीका एआयएमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त खा. ओवेसी यांचे मलकापूर येथे आगमन झाले. यावेळी निवडक माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधतांना त्यांनी वरीलप्रमाणे मत प्रदर्शन केले. पाटण्यातील बैठकीला आमच्यासह बसपा नेत्या मायावती, वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आले नाही. ही बाब न समजण्यासारखी आहे. अगदी २०१९ च्या निवडणुकीपर्यंत भाजप सोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले. मात्र इतरांना टाळले. बैठकीला हजर नेतेच पंतप्रधान मोदी व भाजपला पराभूत करू शकणे अशक्य वाटते. आमच्यासह सर्व धर्म निरपेक्ष पक्ष एकत्र आले तर आणि तरच भाजप पराभूत होऊ शकते असा दावा ओवेसी यांनी बोलून दाखविला. आपला पक्ष धर्म निरपेक्ष असून २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव व नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणे हे आमचे उद्धिष्ट आहे.
आणखी वाचा-पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर एमआयएमची नाराजी; म्हणाले, “भाजपाविरोधात आघाडी करता अन्…”
यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. भाजपच्या ९ वर्षांच्या राजवटीत मोठे लोक नव्हे तर सर्वसामान्य बाधित झाले. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांना लक्ष्य करण्यात आले. ‘माब लिंचींग’ कुणाचं होतं, गोरक्षक कुणाला मारतात…? असा प्रति सवाल त्यांनी केला. वंचित संदर्भात विचारणा केली असता, मी बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून आदर करतो. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होईल सांगू शकत नाही, असे सूचक विधान खा ओवेसी यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. जलील हे हजर होते.